26 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरक्राईमनामाचिमुकल्या वरदचा खून की नरबळी?

चिमुकल्या वरदचा खून की नरबळी?

Related

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका चिमुरड्याचा मृतदेह सापडल्यामुळे सारा कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. कोल्हापुरातील कागल तालुक्यात ही घटना घडली असून हा सर्व प्रकार खुनाचा आहे की नरबळीचा असा सवाल उपस्थित होत आहे. वरद पाटील असे या मृत चिमुरड्याचे नाव असून तो केवळ सात वर्षांचा होता.

आजोबांच्या घरी वास्तुशांती असल्यामुळे सात वर्षीय वरद पाटील हा शाळकरी मुलगा कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक या ठिकाणी आला होता. पण चार दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास तो बेपत्ता झाला. आजोबांच्या घरातून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा संशय सर्वांना आल्यामुळे या संदर्भात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुरगूड पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या मुलाचा कसून तपास करत होते. या मुलाचा शोध घेत पोलिसांनी जंग जंग पछाडले. कोल्हापूर जिल्ह्यापासून ते थेट कर्नाटकमध्ये सुद्धा वरदचा शोध घेण्यात आला. पण या तपासात पोलिसांच्या हाती काहीच आले नाही.

हे ही वाचा:

शिवसैनिकांनी केली ‘या’ नेत्यावर दगडफेक

‘भारतात हिंदू तालिबानी आहेत’ मुनव्वर राणांची मुक्ताफळे

रस्ते, शाळांपेक्षा सायकल ट्रॅक महत्त्वाचा!

‘तुमच्या वरती आम्ही आहोत’ नारायण राणेंचा ठाकरे सरकारला इशारा

आज सकाळी वरदचा मृतदेह सावर्डे बुद्रुक येथील एका स्थानिक तलावात सापडला. सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सारा जिल्हा हादरून गेला. या मृतदेहाची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर सावर्डे बुद्रुक येथील तलावाजवळ गावकऱ्यांचीही मोठी गर्दी जमली.

वरदच्या मृतदेहावर जखमांचे व्रण ठळकपणे दिसत आहेत. त्यामुळे त्याला मारण्याआधी त्याला भरपूर मारहाण करण्यात आल्याचे समजते. तर या संपूर्ण घटनेमागे नरबळीचा संशय वरदचे वडील डॉक्टर रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी मारुती वैद्य यांच्यावर हा आरोप केला आहे. मारुती वैद्य हे रवींद्र पाटील यांचे मित्र असून त्यांना मूल होत नसल्यामुळे त्यांनी वरद पाटीलचा नरबळी दिल्याचा आरोप वरदच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा तपास करणाऱ्या मुरगुड पोलिसांनी मारुती वैद्य यांना अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा