27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरक्राईमनामाथेड स्वीडनहून तरुणी मित्राला भेटायला मुंबईत आली, पण पोलिसांनी केली पाठवणी

थेड स्वीडनहून तरुणी मित्राला भेटायला मुंबईत आली, पण पोलिसांनी केली पाठवणी

Google News Follow

Related

१६ वर्षीय स्वीडिश तरुणी आपल्या सोशल मीडियावरच्या १९ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी पालकांच्या नकळत स्वीडनवरून भारतात आली खरी पण एक महिन्याचा टुरिस्ट व्हिसा घेऊन मुंबईला गेलेल्या या स्वीडिश तरुणीला ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पस मधून गुन्हे शाखेने शोधून काढले आणि शुक्रवारी तिच्या पालकांकडे सुपूर्द केले.

डोंगरीच्या चिल्ड्रेन वेल्फेअर होममधून तिच्या वडिलांनी तिला ताब्यात घेतले आहे. अभियांत्रिकीची विद्यार्थीनी असलेल्या किशोरीवर कोणतेही आरोप लावलेले नाहीत. तिचे पालक भारतीय वंशाचे आहेत.

४ डिसेंबर रोजी नोडल एजन्सी द्वारे ही मुलगी बेपत्ता झाल्याची येल्लो नोटीस जारी करण्यात आली. बेपत्ता व्यक्तीसाठी येल्लो नोटीस जारी होते तेव्हा ती जागतिक पोलिसांसाठी सूचना असते. पोलिसांच्या माहितीनुसार,  जेव्हा तिच्या पालकांनी तिचे इंस्टाग्राम अकाउंट तपासले त्यावरून ती भारतात असल्याचा संशय तिच्या पालकांना आला. मग भारतात तिची शोधमोहीम सुरू झाली.

हे ही वाचा:

पुणे व ठाण्याचे दोन्ही संघ खोखो उपांत्य फेरीत  

चक्क राहुल गांधी म्हणत आहेत, हिंदूची सत्ता आणा!

महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस

मुंबईत १७ प्लॅनिंग ऑथोरिटी, मग काय होणार शहराचे?

 

पोलिसांनी तपास केला तेव्हा असे उघड झाली की,  मुलीने इंस्टाग्रामवर एका मुलाशी मैत्री केली होती आणि प्रदीर्घ मैत्रीनंतर तिने पालकांच्या माहितीशिवाय एक महिन्याचा टुरिस्ट व्हिसा घेतला आणि २७ नोव्हेंबरला ती मुंबईत आली असता त्या मुलाच्या कुटुंबीयांनी तिला त्याच्यासोबत राहू दिले नाही. मुलाच्या कुटुंबीयांनी तिला मुलाच्या चुलत बहिणीसोबत एका दुसऱ्या स्वतंत्र फ्लॅटवर ठेवले. असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

त्याच दिवशी म्हणजे २७ नोव्हेंबरला मुलीच्या पालकांनी स्वीडिश अधिकाऱ्यांकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आणि त्यांनी इंटरपोलची मदत घेतली. त्यांनतर इंटरपोलने सीबीआयच्या माध्यमातून मुंबई पोलिसांशी संपर्क साधला.

क्राइम बॅच युनिट ६ ला पीडितेचा शोध घेण्यास सांगितले होते, जी ट्रॉम्बेमध्ये असल्याचा संशय पोलिसांना होता. “तांत्रिक मदतीने आम्ही मुलीचा शोध घेतला आणि सीबीआयच्या माध्यमातून तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले.” असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. मुलीच्या वडीलांनी त्या किशोरवयीन मुलाविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा