30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषपुणे व ठाण्याचे दोन्ही संघ खोखो उपांत्य फेरीत  

पुणे व ठाण्याचे दोन्ही संघ खोखो उपांत्य फेरीत  

Google News Follow

Related

राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धा

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर हौशी खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ५७ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर येथील पालखी मैदानावर सुरू आहे. पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. ठाणे व सांगली वि. पुणे तर महिलांमध्ये पुणे वि. उस्मानाबाद व रत्नागिरी वि. ठाणे उपांत्य फेरीत भिडणार आहेत.  ठाणे आणि पुण्याचे दोन्ही संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडकले आहेत.

वेळापूरच्या पालखी मैदानावर महिला गटात उस्मानाबादने सातारावर १३-८ असा डावाने दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या वैभवी गायकवाडने आपल्या धारदार आक्रमणात ५ गडी टिपले. आश्विनी शिंदे ( ४.००, १.३० मि. संरक्षण), नम्रता गाडे (२.३० मि. संरक्षण) व किरण शिंदे (२.०० मि. संरक्षण) यांनी उत्कृष्ट खेळी केली. साताराच्या मयुरी जाधवने एक मिनिटे पळतीचा खेळ केला तर संचिता बोडरे हीने दोन बळी टिपले.

दुसऱ्या सामन्यात पुण्याने सोलापूरला १०-७ असे डावाने हरविले. पुण्याच्या प्रियंका इंगळेने (३.२० मि. संरक्षण व ४ गुण) अष्टपैलू खेळी केली. प्रिया भोर हीने नाबाद तीन मि. संरक्षण तर कोमल दारवाटकर हीने ३.१० मि. पळती केली. सोलापूरच्या प्रीती काळे (१.४० मि. संरक्षण) व संध्या सुरवसे (१.२०, १.४० मि. संरक्षण) यांचे प्रयत्न अपुरे पडले व त्यांना मोठ्या परभवाला सामोरे जावे लागले.

अन्य सामन्यात रेश्मा राठोडच्या (३.१० मि. संरक्षण व २गुण) अष्टपैलू खेळामुळे ठाणे जिल्ह्याने मुंबई उपनगरला १०-८ असे डावाने नमविले. रत्नागिरीने सांगलीस १५-१२ असे पराभूत केले. मध्यंतरची १०-६ ही आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. अष्टपैलू कामगिरी करणारी अपेक्षा सुतार (२.५०, १.५० मि. संरक्षण  व ४ गुण) व आरती कांबळे ( १.३०, १.३० मि. संरक्षण व ४गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

पुरुष गटात अरुण गुनकीच्या (१.३०, २.०० मि. संरक्षण व ४गुण) अष्टपैलू कामगिरीमुळे सांगलीने यजमान सोलापूरचा १८-१६ असा डावाने पराभव केला. सोलापूरकडून रामजी कश्यप, राहुल सावंत, अक्षय इंगळे, विनीत दिनकर यांनी प्रत्येकी ३ गडी टिपले. दुसऱ्या सामन्यात पुण्याने उस्मानाबादवर १७-११ अशी डावाने एकतर्फी मात केली. त्यांच्या मिलिंद करपे याने पाच गडी बाद केले. राहूल मंडलने २.२० मि. संरक्षण व अभिषेक खेंडेकर २.०० मिनिटे पळती केली.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड यांची तात्काळ हकालपट्टी करा

जिथे भगवा ध्वज उखडला; तिथेच हिंदूंनी उभारला १०८ फुटी ध्वजस्तंभ

चक्क राहुल गांधी म्हणत आहेत, हिंदूची सत्ता आणा!

महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस

 

अन्य सामन्यात ठाण्याने मुंबईवर १८-१७ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळविला. त्यांच्या लक्ष्मण गवस व शुभम उत्तेकर त्यांनी प्रत्येकी दोन मिनिटे पळती करीत तीन गडी टिपले. हर्षद हातणकरच्या (१.००, १.२० मि. संरक्षण व ३ गुण) अष्टपैलू खेळामुळे मुंबई उपनगरने अहमदनगरला १५-१३ असे ७.३० मिनिटे राखून हरविले. अहमदनगरच्या आकाश ढोले (१.४० मिनिटे व ३गुण) याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा