गुजरातच्या गोध्रामध्ये मुस्लीम समुदायाच्या लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातल्याची घटना घडली. जातीय भावना भडकवणारी विधाने करून रील बनवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता ही घटना घडली. मोठ्या संख्येने लोकांनी पोलीस ठाणे परिसरात गर्दी केली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
“आय लव्ह मोहम्मद” अशा आशयाचा रील बनवणाऱ्या एकाला गोध्रा बी डिव्हिजन पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान या तरुणाला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला. यानंतर अचानक मुस्लीम समुदायाच्या लोकांनी पोलीस ठाण्याकडे गर्दी करत घोषणाबाजी केली. तसेच पोलिसांवर हल्ला आणि दगडफेक करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. यात दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. यानंतर परिसरात तणाव वाढला होता. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
हे ही वाचा :
ट्रक चालक अपहरण प्रकरणी खेडकर कुटुंबियांच्या ड्रायव्हरला अटक
बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना अटक
एच-१ बी व्हिसासाठी मोजावे लागणार १ लाख डॉलर्स! ट्रम्प यांनी का घेतला निर्णय?
ऑपरेशन सिंदूरनंतर पीओके वाटतोय असुरक्षित! पाकच्या ‘या’ भागात उभारतायत दहशतवादी तळ
पंचमहलचे पोलिस अधीक्षक हरेश दुधाट म्हणाले, “संबंधित तरुण वारंवार सोशल मीडियावर रील्स बनवत होता आणि नवरात्रीत अशांतता निर्माण करू शकणाऱ्या कंटेंटबद्दल सावध करण्यासाठी त्याला बोलावण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी त्याला मारहाण केल्याची चुकीची माहिती पसरली. त्यानंतर जमाव जमला आणि गोंधळ उडाला. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. लाठीमार फक्त जमावाला पांगवण्यासाठी करण्यात आला होता. गर्दी आणि धक्काबुकी यामुळे किरकोळ दुखापत झाली असेल, परंतु कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. परिस्थिती आता शांत आहे. आम्ही धार्मिक नेत्यांना शांततेचे आवाहन केले आहे.”







