29 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरक्राईमनामाऍप्लिकेशनच्या आधारे बसणार मोबाइल चोरीला आळा.

ऍप्लिकेशनच्या आधारे बसणार मोबाइल चोरीला आळा.

मोबाइल चोरीला बसणार आळा

Google News Follow

Related

मुंबईत सध्या मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता केंद्र सरकारच्या सीईआयआर ऍप्लिकेशनच्या मध्यामातून मोबाइल चोरीला कायमचा आळा बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या ऍप्लिकेशनमधील तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीला अथवा गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो. तसेच या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आता पर्यत ६० मोबाईलची बाजारातील किंमत सहा लाख रुपये असून बदलापूर पोलिसांच्या सायबर विभागाच्या अधिकाऱ्याने उत्तम कामगिरी करत हे मोबाइल मिळवले आहेत. तसेच हे मिळालेले मोबाईल सोमवारी नागरिकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

तसेच बदलापूर पश्चिम पोलिस स्थानकाच्या हद्दीत २०२१-२२ च्या काळात एकूण २५० मोबाइल चोरीला व गहाळ झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे परीमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर पोलिस स्थानाकाच्या हद्दीत मागील काही वर्षापासून मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच केंद्र सरकारच्या सीईआयआर हे तंत्र विकसित केले असून, यांचे गुन्हे शाखेच्या विभागाने नुकतेच स्थानिक पोलिस स्थानकाच्या सायबर विभागाच्या अधिकाऱ्याना या तंत्राचे प्रशिक्षण दिले आहे.

हे ही वाचा:

भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी

नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती

घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….

दादर, ठाणे रेल्वे स्टेशनवरील ‘स्टॉल’ उचलणा

बदलापुर सायबर विभाग सांभाळणरे हनुमंत हुबे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता गावडे आणि वरीष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सीईआयआर ऍप्लिकेशनच्या तंत्रज्ञानाचे वापर करत ६ लाख किंमतीच्या ६० मोबाइल देशभरातून शोध घेतला. तसेच या तंत्रज्ञानाच्या मदतीने जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, कोलकत्ता आणि कर्नाटक येथे वापरात असलेले मोबाइल शोधून काढले आहेत. अशी माहीती पोलिस निरिक्षक दत्ता गावडे यांनी दिली. तसेच ४० मोबाइल नागरिकांकडे सुपूर्द करण्यात आले असून, उर्वरित २० नागरिक उपस्तीत न राहू शकल्याने त्यांचे मोबाइल नंतर सुपूर्द करण्यात येणार आहे. सीईआयआर ऍप्लिकेशनच्या मदतीने मोबाइल चोरीच्या घटनांना आला बसेल असे सायबर पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा