30.8 C
Mumbai
Wednesday, June 10, 2026
घरक्राईमनामाशहजाद भट्टीशी संबंधित दहशतवादी-गँगस्टर प्रकरणांमध्ये छापेमारी

शहजाद भट्टीशी संबंधित दहशतवादी-गँगस्टर प्रकरणांमध्ये छापेमारी

एनआयएची पंजाब आणि हरियाणात कारवाई

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या दहशतवादी शहजाद भट्टीशी संबंधित तीन दहशतवादी-गँगस्टर नेटवर्क प्रकरणांच्या तपासाअंतर्गत मंगळवारी (९ जून) पंजाब आणि हरियाणा राज्यांतील विविध ठिकाणी छापे टाकले. एनआयएच्या पथकांनी दोन्ही राज्यांतील नऊ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी १८ ठिकाणी शोधमोहीम राबवली. यावेळी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आली. तसेच अनेक डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणांमध्ये संशयित व्यक्तींच्या हालचाली, संपर्क जाळे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहितीही तपास यंत्रणेला मिळाली आहे.

छापेमारीदरम्यान जप्त करण्यात आलेले सर्व पुरावे, माहिती आणि दस्तऐवज पुढील तपासणी, न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) विश्लेषण आणि तांत्रिक तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. या माध्यमातून सीमापार रचल्या गेलेल्या मोठ्या कटाचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गँगस्टर ते दहशतवादी असा प्रवास केलेल्या शहजाद भट्टीकडून सीमापार चालविल्या जाणाऱ्या नेटवर्कमागील व्यापक कटकारस्थानाचा शोध घेण्यासाठी एनआयएचा तपास सुरू आहे. त्याअंतर्गत काही व्यक्तींना पुढील चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. आजच्या कारवाईचा उद्देश भट्टीचे सहकारी आणि या तिन्ही प्रकरणांशी संबंधित दहशतवादी कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवणे हा होता.

एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासात मार्च २०२५ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रोजर संधू यांच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याचे धागेदोरे शहजाद भट्टीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. एप्रिल २०२६ मध्ये एनआयएने भट्टीला फरार घोषित करत या प्रकरणात आणखी एका आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

तपासादरम्यान हेही उघड झाले आहे की, नोव्हेंबर २०२५ मध्ये हरियाणातील सिरसा येथील महिला पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटामागे आणि जानेवारी २०२६ मध्ये अंबाला येथील बलदेव नगर पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटामागेही भट्टीचा हात होता. सिरसा स्फोट प्रकरणात एनआयएने मे २०२६ मध्ये भट्टीसह पाकिस्तानस्थित आणखी एक सूत्रधार सोहेल अहमद उर्फ सोहेल बलोच आणि इतर मिळून नऊ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

हे ही वाचा:

इस्रायलमध्ये उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले

पिनराई विजयन यांच्या कन्या वीणा विजयन यांना ईडीचे समन्स

IPO पूर्वी झेप्टोवर ईडीची नजर; परदेशी गुंतवणुक प्रकरणी चौकशी

बलदेव नगर पोलीस ठाणे स्फोटप्रकरण हे कार बॉम्ब हल्ल्याशी संबंधित असून, अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचे भट्टीशी थेट संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित सर्व धागेदोरे शोधून काढण्यासाठी आणि या कटामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी एनआयएचा तपास वेगाने सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
312,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा