मेघालयातील शिलाँग येथे बेपत्ता झालेल्या दांपत्यासंदर्भातील भयानक वास्तव समोर आले असून त्यातील राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडला होता तर त्याची पत्नी सोनम मात्र सापडली नव्हती. आता ती पोलिस ठाण्यात शरण आली असून पतीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर पोलिस ठाण्यात सोनम शरण आली.
२३ मे रोजी या दांपत्यातील राजा रघुवंशी हा बेपत्ता होता. पण त्यानंतर सोनम काही सापडत नव्हती. तिची हत्या झाली की तिला कुणी अपहृत केले, याविषयी माहिती समोर येत नव्हती. अखेर ती गाझीपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली.
सोनम हिचे तिच्या वडिलांच्या कंपनीतील मॅनेजरशी प्रेमप्रकरण सुरू होते. तिच्या लग्नाआधीपासून हे प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र सदर राजा कुशवाह यानेच हे दांपत्य हनिमूनला गेलेले असताना राजा रघुवंशीचा काटा काढण्यात आला.
या सगळ्या घटनेत सोनमच्या वडिलांनी यात सुपारी देऊन मारल्याच्या संशयाचा इन्कार केला आहे. मेघालयच्या पोलिसांनी हा बनाव रचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात सीबीआयने तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच असेही म्हणणे आहे की, त्यांची मुलगी सोनमने त्यांना सांगितले की, तिचे आणि तिच्या पतीचे अपहरण करण्यात आले. त्यांना लुबाडण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलीने सांगितले की, ती उत्तरप्रदेशला कशी आली हे तिला ठाऊक नाही.
हे ही वाचा:
भारतीय कंपन्यांवर एआय आधारित सायबर हल्ले किती झाले ?
फक्त ५ ते १० मिनिटं… नजर वाढवण्यासाठी योगासने
जिंकता येईना, आता निवडणूक आयोगच वाकडा
सोनमचा पती ज्याची या प्रकरणात हत्या झाली, त्याचा भाऊ विपुल म्हणतो की, राज कुशवाह हा सोनमच्या वडिलांच्या कंपनीत कामाला आहे. त्याचा सोनमशी वारंवार संपर्क होता. सोनम या प्रकरणात सामील असल्याचा भावाचा आरोप आहे. भावाने सांगितले की, त्यांचे मेघालयचे तिकीट होते पण परतीचे तिकीटच नव्हते.
राजा रघुवंशीच्या भावाने म्हटले की, सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह हा तिच्या वडिलांच्या कंपनीत कामाला होता. ते एकमेकांशी सातत्याने संपर्कात होते.
राज कुशवाह याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे कारस्थान उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मेघालय अशा तीन राज्यात घडलेले आहे.
या घटनेची संपूर्ण योजना इंदूरला रचण्यात आल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्ष राजा रघुवंशीचा खून हा मेघालयात झाला. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून दोघांना उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे तर दुसऱ्याला उत्तर प्रदेशातील ललितपूरमधून पकडण्यात आले. सोनम ही उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सापडली.







