भारतातील सुमारे ७२ टक्के संस्थांवर गेल्या वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित सायबर हल्ले झाले, अशी माहिती एका ताज्या अहवालात देण्यात आली आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील फोर्टिनेट कंपनी आणि ग्लोबल रिसर्च एजन्सी IDC यांच्या संयुक्त अहवालानुसार, सायबर गुन्हेगारांसाठी एआय हे आता एक नवीन आणि प्रभावी शस्त्र ठरले आहे. याच्या मदतीने ते अधिक गुप्त आणि धोकादायक पद्धतीने हल्ले करत आहेत.
अहवालानुसार, या एआय-आधारित हल्ल्यांची केवळ संख्या वाढत नाहीये, तर त्यांचा शोध घेणेही अधिकाधिक कठीण होत आहे. हे हल्ले अशा क्षेत्रांमध्ये झपाट्याने होत आहेत, जिथे पारंपरिक सायबर सुरक्षा उपाय अपयशी ठरतात. भारतामध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या एआय-सक्षम धोक्यांमध्ये क्रेडेन्शियल स्टफिंग, ब्रूट फोर्स अटॅक, डीपफेकद्वारे बिझनेस ईमेलची फसवणूक, एआय-निर्मित फिशिंग स्कॅम्स आणि पॉलीमॉर्फिक मालवेअर यांचा समावेश आहे.
हेही वाचा..
गाझा दिशेने जाणाऱ्या ‘मॅडलीन’ जहाजाला रोखले
मोदींच्या विचारांनी ग्रामीण प्रतिभेला मिळाला सन्मान
आयईडी स्फोटात अॅडिशनल एसपी आकाश राव गिरिपुंजे हुतात्मा
हरल्यानंतर राहुल गांधींचं बिनसत
यापेक्षाही अधिक चिंतेची बाब म्हणजे, अनेक भारतीय कंपन्या या प्रकारच्या अॅडव्हान्स हल्ल्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्यास अजून पुरेशा प्रमाणात सज्ज नाहीत. केवळ १४ टक्के संस्थांनीच असे सांगितले की, त्यांना अशा हल्ल्यांपासून संरक्षण करण्याची पूर्ण खात्री आहे. याचवेळी, ३६ टक्के संस्थांनी कबूल केले की, एआय-आधारित हल्ल्यांची ओळख पटवणे त्यांच्या क्षमतेबाहेर गेले आहे, तर २१ टक्के संस्थांकडे असे हल्ले ट्रॅक करण्यासाठी कोणतेही यंत्रणा नाही.
IDC चे आशिया/प्रशांत (एपी) विभागाचे संशोधन उपाध्यक्ष साइमन पिफ म्हणाले, “सायबर गुन्हेगारांच्या टूलकिटमध्ये एआयचा समावेश हा भविष्यातील नाही तर सध्याच्या काळातील धोका आहे.” ते पुढे म्हणाले, “संस्थांनी आता फक्त प्रतिक्रिया देणाऱ्या रणनीतींपलीकडे जाऊन प्रीडिक्टिव्ह आणि इंटेलिजन्स-आधारित सायबर सुरक्षा मॉडेल अंगीकारण्याची गरज आहे.” अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, सायबर धोके हे भारतीय व्यवसायांसाठी एक कायमस्वरूपी समस्या बनली आहे. आता हे हल्ले क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर आणि सॉफ्टवेअर सप्लाय चेन ला लक्ष्य करत आहेत.
फिशिंग आणि रॅन्समवेअर यांसारखे जुने धोके अजूनही अस्तित्वात आहेत, परंतु आतून होणारे धोके (इन्सायडर थ्रेट्स) आणि क्लाउड मिसकॉन्फिगरेशन हे अधिक गंभीर मानले जात आहेत. फोर्टिनेट इंडिया आणि SAARC विभागाचे कंट्री मॅनेजर विवेक श्रीवास्तव म्हणाले, “एआय हे सध्या सर्वात मोठा धोका आहे आणि त्याचवेळी सर्वात सामर्थ्यशाली संरक्षण उपायसुद्धा.”
