32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामापालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांभोवती ड्रग्सचा विळखा

पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांभोवती ड्रग्सचा विळखा

Google News Follow

Related

शहरातील झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या बहुतांश तरुण,अल्पवयीन मुले ड्रग्सच्या विळख्यात अडकली जात आहे. अल्पवयीन मुलांना ड्रग्सची सवय लावून त्यानंतर त्याच मुलांना ड्रग्स मिळवण्यासाठी चोऱ्या, घरफोड्या करायला लावणाऱ्या अनेक टोळ्या झोपडपट्ट्यामध्ये सक्रिय आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने माहीम येथे नुकत्याच केलेल्या कारवाईत एका ड्रग्स पेडलरला अटक केली असून ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या १५ ते २० अल्पवयीन मुलांना एनसीबीने ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

माहीम येथे असणाऱ्या मकदुम शाह बाबाचा दर्गा असल्यामुळे मुंबई तसेच मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे या ठिकाणी भिक्षेकरुंची संख्या मोठी आहे. अनेक भिक्षेकरी कुटुंब दर्गा परिसरातील पदपथावर वास्तव्यास आहे. येथील बहुतांश भिक्षेकरी हे नशापाणी करतात. भिक्षेतून मिळणारे पैसे ही मंडळी नशापाणी वर उडवतात, त्यामुळे या परिसरात ड्रग्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. गांजा, चरस, एमडी, बटन हे अमली पदार्थची विक्री करणाऱ्याची संख्या मोठी आहे.

हे ही वाचा:

कोरोनामुळे पंढरपुरातील उलाढाल थांबली

मराठी सिनेमा चे ‘प्रीमियर’

महिलेला गंडा घालताना पोलिसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या

समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याचे काय करणार आहात?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे मागील अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या तक्रारी येत असल्यामुळे शनिवारी रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने माहीम दर्गा परिसरात सर्च ऑपरेशन राबवून माहीम बीच परिसरातील वसीम मोहम्मद शमीम नागोर या ड्रग विक्रेत्याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून मोठ्या प्रमाणात चरस सापडले आहे. त्याचप्रमाणे एनसीबीच्या पथकाने ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या १४ ते १८ वयोगटातील १५ ते २० अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अधिक चौकशीत अटक करण्यात आलेला वसीम हा लहान मुलांना नशेच्या आहारी लोटून त्यांच्याकडून असामाजिक कृत्य करून घेत होता. माहीमप्रमाणेच गोवंडी, शिवाजी नगर, देवनार, कुर्ला, भेंडीबाजार, डोंगरी, मालवणी, वांद्रे भारत नगर, धारावी या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात तरुणांना ड्रग्सच्या विळख्यात अडकवले जात आहे. गांजा, चरस, बटन, व्हाईटनर, कोरेक्स सिरप या सारख्या नशेचे पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा