32.3 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरक्राईमनामाभांडुपमधील निवृत्त बँक व्यवस्थापकाला ४० लाखांना लुटले

भांडुपमधील निवृत्त बँक व्यवस्थापकाला ४० लाखांना लुटले

डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढले

Google News Follow

Related

दिल्ली पोलिसांचा आणि ‘एनआयए’चा अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी भांडुप येथील निवृत्त बँक व्यवस्थापकाची तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप (पश्चिम) येथील अरुणोदय टॉवरमध्ये राहणारे ६१ वर्षीय राजेंद्र तुकाराम सुर्वे (वय ६१) हे निवृत्त बँक व्यवस्थापक आहेत. १० मार्च २०२६ रोजी त्यांना सिग्नल ॲपवर एका अज्ञात क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण दिल्ली पोलीस आणि एनआयएचे पीएसआय सिंग असल्याचे सांगितले.

भामट्यांनी सुर्वे यांना सांगितले की, दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयिताच्या मोबाईल डेटामध्ये त्यांचे नाव, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर आढळला आहे. तसेच, त्यांच्या नावावर कर्नाटकातील हुबळी येथे आयसीआयसीआय बँकेचे खाते उघडून २ कोटी ६५ लाख रुपयांचा मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या नावाखाली त्यांना भीती दाखवण्यात आली.

हे ही वाचा:

तेलाचे दर ११० डॉलरच्यावर कायम

‘उद्योग गेले, सत्ता गेली’ : ममता बॅनर्जी पराभूत

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाक सैन्य हाफिज सईद, मसूद अझरसाठी लढले

प. बंगालमधील भाजपाच्या प्रचंड विजयानंतर अनेक वर्षे बंद असलेले दुर्गा मंदिर खुले

सुर्वे यांना वेगळ्या खोलीत जाण्यास सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. अटकेची भीती दाखवून भामट्यांनी त्यांच्याकडून विविध खात्यांवर तब्बल ४० लाख ९० हजार रुपये आरटीजीएसद्वारे (RTGS) जमा करून घेतले.

अशी झाली फसवणूक:
२ लाख ९० हजार रुपये:११ मार्च २०२६ रोजी करुर वैश्य बँकेत.
२८ लाख रुपये:१३ मार्च २०२६ रोजी आयसीआयसीआय बँकेत.
१० लाख रुपये: १८ मार्च २०२६ रोजी इंडसइंड बँकेत (पत्नीने नाबार्ड बँकेतून कर्ज घेऊन दिलेली रक्कम).रक्कम पाठवल्यानंतर आरोपींनी प्रकरण मिटल्याचे सांगून फोन बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुर्वे यांनी सायबर क्राईमच्या १९३० या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवून सायबर पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा