32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरक्राईमनामासुहेल खंडवानी, सलीम फ्रूट, समीर हिंगोरा NIA च्या ताब्यात

सुहेल खंडवानी, सलीम फ्रूट, समीर हिंगोरा NIA च्या ताब्यात

Google News Follow

Related

ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा साथीदार आणि मुंबईतील माहिम, हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी आणि छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट याला NIA ने ताब्यात घेतले आहे. मुंबईत आज, ९ मे रोजी सकाळपासून एनआयएची छापेमारी सुरु होती. दाऊदशी संबंधित अशा २९ ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे.

या कारवाई दरम्यान माहीम येथून हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी आणि ग्रॅंटरोड भागातून छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट याला ताब्यात घेण्यात आले आहे. बोरिवलीमधील कृष्णा हेरिटेजमधील अजय गोसलिया याच्या घरीही NIA चे धाड सत्र सुरू आहे. समीर हिंगोरा याला डिलाईट अपार्टमेंट येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सलीम हिंगोरा यांच नाव संजय दत्त प्रकरणात समोर आले होते. १९९३ च्या खटल्यातील आरोपींशी त्याचा संबंध होता. संजय दत्त याच्या घरी सापडलेल्या एके ४७ हत्यार तस्करीत समीर हिंगोरा याच नाव समोर आले होते. समीर हिंगोरा नऊ वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आला आहे.

सोमवार, ९ मे रोजी सकाळी NIA ने कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान, डी कंपनीसंबंधी NIA ने मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. मुंबईतील बोरिवली, मुंब्रा, नागपाडा, गोरेगाव, सांताक्रूझ, भेंडी बाजार या ठिकाणी हे छापे टाकले जात आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजा इतके रुपये

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक

कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

NIA ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात अनेक ठिकाणी छोटा शकील, इकबाल मिर्ची, जावेद चिकना आणि इतर लोकांसोबत दाऊदने आपले हातपाय पसरले होते. भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती NIA ने दिली असून त्या पार्श्वभूमिवरच कारवाई करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा