34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषआठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Google News Follow

Related

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार, ९ मे रोजी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.

पश्चिम रेल्वेवरील दहिसर ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. या दोन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील जलद लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे चर्चगेटकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला असून विरारकडे जाणाऱ्या गाड्याही उशिरा धावत आहेत.

या तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कामावर निघालेल्या चारकमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हे ही वाचा:

नांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक

कुमार विश्वास यांनी देशातील जनतेला दिली एक गंभीर वॉर्निंग

म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’

दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच वाजता दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यानंतर प्रवाशांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. काही वेळातच लोकल सेवा सुरळीत होईल असे देखील रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा