28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामाआपल्या पतीने सतीश कौशिक यांचा खून केला; उद्योगपतीच्या पत्नीचा खळबळजनक दावा

आपल्या पतीने सतीश कौशिक यांचा खून केला; उद्योगपतीच्या पत्नीचा खळबळजनक दावा

कुबेर ग्रुपचे संचालक आणि उद्योगपती विकास मालू यांच्या पत्नी सान्वी मालू यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केला आहे.

Google News Follow

Related

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली असताना आता या मृत्युमागे काही संशयास्पद घडले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता सतीश कौशिक यांचा नैसर्गिक मृत्यु नसून तो खून असल्याचा नवा दावा पुढे आला आहे.

कुबेर ग्रुपचे संचालक आणि उद्योगपती विकास मालू यांच्या पत्नी सान्वी मालू यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केला आहे. दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून त्यांनी म्हटले आहे की, आपल्या पतीने कौशिक यांची हत्या केली आहे. मालू यांच्या फार्म हाऊसवर कौशिक यांच्या मृत्यूपूर्वी पार्टी झाली होती आणि त्यानंतर त्यांचा घरी आल्यावर मृत्यू झाला. अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

१२ मार्च १९९३: १० हजार पानी आरोपपत्र, १०० दोषी, १४ फाशी

संकेतस्थळावर पंतप्रधानांनी कायमची कोरली आई ‘हिराबा’ ची आठवण

ईडीच्या कारवाईमुळे आठवला वाल्या कोळी

शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल

या पत्रात सान्वी मालू यांनी म्हटले आहे की, कौशिक यांनी विकास मालू यांना १५ कोटी रुपये दिले होते. हे पैसे गुंतवणूक करण्यासाठी कौशिक यांनी दिले होते. मात्र ते पैसे परत करण्यासाठी जेव्हा परदेशात त्यांची भेट झाली तेव्हा कौशिक यांनी तगादा लावला. कौशिक आणि मालू यांच्यात जोरदार भांडणही झाले. शेवटी मालू यांनी ते पैसे आपण परत करू असे आश्वासन दिले.

विकास मालू यांच्या फार्म हाऊसमधील पार्टीनंतर कौशिक आजारी पडल्यामुळे आपल्याला असा संशय येतो आहे की, आपल्या पतीने त्यांच्यावर विषप्रयोग केला असावा. गेल्या वर्षी सान्वी मालू यांनी आपले पती विकास मालू यांच्यावर बलात्काराचाही आरोप केला होता.

दरम्यान, पोलिसांनी मात्र शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा असे म्हटले आहे. पण सतीश कौशिक या फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते तिथे काही औषधे सापडली असून त्यावरून पुन्हा एकदा या मृत्यूसंदर्भात संशय निर्माण झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा