30 C
Mumbai
Sunday, June 26, 2022
घरक्राईमनामामुंबईतील उचभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेट उध्वस्त

मुंबईतील उचभ्रू वस्तीतील सेक्स रॅकेट उध्वस्त

Related

मुंबईतल्या व्ही. पी. रोड परिसरातल्या एका इमारतीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यात ३३ पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी एका इमारतीत छापा टाकून हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. या कारवाईत ८ ग्राहक, ग्राहकांना सेवा पुरवणारे ९ इसम तसेच ६ दलालांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून बनावट ग्राहक बनून ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त सुहास वारके यांच्या नेतृत्वात ही मोठी कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा:

…. म्हणून अंबानी खरेदी करणार अमेरिकन कंपनी

गौतम अदानींचा कंठ दाटून का आला?

‘भविष्यात गाड्या,कारखाने,विमान हायड्रोजनवर चालणार’

काँग्रेसच्या महिला आंदोलनात महिलाच गायब

 

गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने ही कारवाई करताना गिरगाव येथील नवलकर रोडवरील दोन मजली इमारतीत धडक दिली. तिथे या ३३ महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.

व्ही. पी. रोड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,936चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
10,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा