28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरक्राईमनामामुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला ओलांडून महिलेने नेली गाडी

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला ओलांडून महिलेने नेली गाडी

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा मलबार हिल परिसरात असताना एक गाडी ताफ्याच्या मधूनच रस्ता ओलांडून गेल्यामुळे खळबळ उडाली. एका महिलेने हा ताफा निघालेला असताना मोकळा रस्ता झाल्यावर गाडी वळवली आणि बाजुच्या रस्त्याने ती उलट दिशेला रवाना झाली.

या महिलेने ताफ्याच्या दरम्यान गाडी घातल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये खळबळ उडाली. संध्याकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. एक पायलट कार या रस्त्यावरून निघाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची गाडी ही बरीच मागे होती. त्यादरम्यान मोकळा रस्ता असल्यामुळे छोट्या गल्लीतून आलेल्या या कारने रस्ता ओलांडला आणि ती उलट दिशेने रवाना झाली. या महिलेवर आयपीसी २७९ अंतर्गत निष्काळजीपणे गाडी चालविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या महिलेला चौकशीसाठी मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

गौतम अदानींचा कंठ दाटून का आला???

‘भविष्यात गाड्या,कारखाने,विमान हायड्रोजनवर चालणार’

दहावी निकालात कोकण ९९.२७ टक्के

मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली

 

मागे वांद्रे येथे मातोश्रीजवळ मुख्यमंत्र्यांचा ताफा शिरत असताना तिथेही एका बाईकवाल्याने गाडी नेली होती, त्यावर त्याला पकडण्यात आले होते. तेव्हाही खळबळ उडाली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा