35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामाहत्याकांडानंतर सापडलेले ते डोके श्रद्धाचे?

हत्याकांडानंतर सापडलेले ते डोके श्रद्धाचे?

मित्रांना भीती होती काहीतरी विपरित घडणार आहे

Google News Follow

Related

श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्याकांडानंतर देशभर संताप व्यक्त होतोय. रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. आतापर्यंत पोलिसांना श्रद्धाचे डोके आणि तिच्या शरीराचे अनेक भाग जप्त करण्यात यश आलेले नाही. श्रद्धाच्या हत्याकांडानंतर जून महिन्यात दिल्लीच्या पांडव नगर पोलिस ठाणे हद्दीत त्रिलोकपुरी येथे पोलिसांना कापलेले डोके आणि हात सापडला होता. मानवी अवयव मिळण्याची ही घटना श्रद्धाच्या मृत्यूनंतर घडली होती. त्यावेळी श्रद्धाच्या खून प्रकरणाचा उलगडा झालेला नव्हता. त्यातही हे डोके व हात कोणाचे होते, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. पोलिसांना मिळालेल्या डोक्याचा आणि हाताचा भाग जो पोलिसांना मिळाला त्याची अवस्था बिकट होती.

पोलिसांच्या चौकशीला आफताब उलट-सुलट उत्तरं देऊन दिशाभूल करतोय. त्यामुळे पोलिसांना श्रद्धाचे डोके शोधण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मेहरौलीच्या जंगलात सापडलेली हाडे डीएन चाचणीसाठी पाठवण्यात आली आहेत. या दोन्ही ठिकाणी सापडलेल्या सर्व तुकड्यांचा डीएनए रिपोर्ट जुळत असून, हे मृतदेह श्रद्धाचेच आहेत का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

श्रद्धाच्या नात्याला घरच्यांचा विरोध

मी २५ वर्षांची झाली आहे. मला माझे स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला आफताबसोबत राहायचे आहे. आजपासून मी तुमची मुलगी नाही, असे सांगत श्रद्धा घरातून निघून गेली. तेव्हा घरच्यांनी तिला खूप विनवणी केली, पण ती विनवणी धुडकावून ती आफताबसोबत निघून गेली.

आफताब मारहाण करायचा

आफताबसोबत गेल्यानंतर श्रद्धा तिच्या आईला फोन करून आफताब मारहाण करतो असे सांगितले होते. दरम्यान, तिच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर श्रद्धाने वडिलांना एक-दोनदा फोन केला होता. आफताब मारहाण करतो असे सांगितले. त्यावेळेस वडिलांनी आफताबला घरी सोडण्यास सांगितले. परंतु आफताबने माफी मागितल्यावर ती परत त्याच्यासोबत निघून गेली.

हेही वाचा :

चोरी केल्याच्या संशयावरून कुटुंबाला बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

श्रद्धाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिस करणार आफताबची नार्को टेस्ट

मित्राने दिली माहिती

श्रद्धाचे मित्र शिवानी माथरे आणि लक्ष्मण नाडर यांनी सांगितले, श्रद्धा आणि आफताबमध्ये काही ठिकठाक नाही. आफताब नेहमी श्रद्धाला मारहाण करतो.  दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी श्रद्धाचा भाऊ विजय यांनी श्रद्धाचा मित्र लक्ष्मण याने फोन करून विचारणा केली. श्रद्धाचा फोन दोन महिन्यांपासून बंद आहे.

वडिलांनी हरवल्याची तक्रार केली

श्रद्धाच्या वडिल तिचा मित्र लक्ष्मणशी बोलले. लक्ष्मणशी बोलून महाराष्ट्रातील माणिकपूर पोलिस ठाण्यात श्रद्धाच्या हरवल्याची तक्रार दाखल केली. रिपोर्ट दाखल केल्यानंतर श्रद्धा आफताबसोबत दिल्लीत राहत असल्याचे समोर आले. यावर त्यांनी दिल्लीच्या मेहरौली पोलिस ठाणे गाठून आफताबविरुद्ध अपहरण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला.

लग्नावरून दोघांमध्ये भांडण

तपास सुरू झाल्यावर घटनेचे पदर उघडू लागले. आफताबच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की, १८ मे रोजी लग्नावरून दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर त्याने प्रथम श्रद्धाची फ्लॅटमध्ये धारदार शस्त्राने हत्या केली. त्यांनतर करवतीने हाताचे तीन तुकडे केले. यानंतर पायाचेही तीन तुकडे केले. तसेच संपूर्ण शरीराचे ३५ तुकडे केल्याचे  आफताबने पोलिसांना सांगितले. आफताब काही तुकडे घेऊन दररोज शहराच्या विविध भागात आणि जंगलात जाऊन त्याची विल्हेवाट लावत असे. त्याला असे वाटले होते की, आपणाला कोणीही पकडू शकणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा