28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरक्राईमनामाश्रद्धाच्या हत्येसंदर्भात फक्त किचनमध्ये सापडले रक्ताचे अंश

श्रद्धाच्या हत्येसंदर्भात फक्त किचनमध्ये सापडले रक्ताचे अंश

पॉलिथीनमध्ये ठेवले १७-१८ शरीराचे तुकडे

Google News Follow

Related

श्रद्धा हत्याकांड हे दिल्ली पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. आरोपी आफताब अमीन पूनावाला याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासात पोलिसांना सहाकार्य करत नाही, त्यामुळे आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. हत्येसाठी वापरलेले हत्यार आणि श्रद्धाचा मोबाइल जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. बुधवारी पोलिसांनी आफताबला त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेले होते. ज्या ठिकाणी त्याने श्रद्धाचा खून केला होता. दरम्यान, फॉरेंसिक टीमने या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. तपासादरम्यान फॉरेंसिक टीमला संपूर्ण फ्लॅटमध्ये फक्त एकाच ठिकाणी रक्ताचे अंश सापडले आहेत, ते सुद्धा किचनमध्ये.

चौकशीदरम्यान आफताबने सांगितले की, श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा त्याने स्वयंपाकघरातही ठेवला होता. तेथूनच रक्ताचे अंश तपासादरम्यान सापडले आहेत. आफताबने खोली, बाथरूम सर्वकाही स्वच्छ केले होते. खुनालाही बरेच दिवस झाल्यामुळे खोलीची साफसफाई बऱ्याच वेळा झालेली होती. रक्ताचे अंश शोधण्यासाठी रसायनाचा वापर केल्यामुळे इतर ठिकाणी रक्ताचे अंश सापडलेले नाहीत, असे अधिकाऱ्याने सांगितले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे बाथरूममध्ये तुकडे केले होते. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करताना त्याने पाण्याचा जास्तीत जास्त वापर केला. बाथरूममध्ये सतत पाण्याचा वापर होत असल्याने तेथे रक्ताचे डाग मिळणे कठिण असते, हे पाताळयंत्री आफताबला चांगलेच ठाऊक होते. आफताबने मुरलेल्या खुन्याप्रमाणे सर्वकाही केमिकलने साफ केले होते.

हेही वाचा :

वरळीतील केमिकल गळतीत ४ जण पोळले

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीने २०३४ पर्यंत सत्ता विसरून जावे’

रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

पॉलिथीनमध्ये ठेवले १७-१८ शरीराचे तुकडे

तपासादरम्यान मेहरौलीच्या नाल्यातून हाडे सापडली आहेत. आफताबने श्रद्धाच्या शरीराच्या तुकड्यांची कुठे विल्हेवाट लावली हे सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास करून त्याचा शोध लावला. तसेच आफताबने १७-१८ शरीराचे अवयव फ्रीजमध्ये पॉलिथिनमध्ये ठेवले होते असे सांगितले. हाडांचे डीएनए जुळले तर ते श्रद्धाचे असल्याचे स्पष्ट होणार आहे. मात्र, ज्या बेडवर श्रद्धाचा गळा दाबला गेला. मात्र तेथे काहीही सापडले नाही.

मृतदेहाचे तुकडे करण्यास लागले १० तास

हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यास १० तास लागल्याचे आफताबने चौकशीदरम्यान सांगितले. मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून चेहरा आफताबने जाळला होता. यादरम्यान थकवा आल्यानंतर त्याने विश्रांतीही घेतली. नंतर बिअर आणि सिगरट प्यायला. ऑनलाइन जेवण ऑर्डर केले आणि नेटफ्लिक्सवर एक चित्रपट पाहिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा