32 C
Mumbai
Sunday, November 27, 2022
घरक्राईमनामानवाब मलिक यांना भोवणार समीर वानखेडे प्रकरण

नवाब मलिक यांना भोवणार समीर वानखेडे प्रकरण

नव्या प्रकरणामुळे अडचणीत भर

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाब मलिक याच्याविरुद्ध वाशिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध जातीय टिप्पणी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरुद्ध ‘एट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश वाशिम न्यायालयाने दिले होते. या अंतर्गत आता त्याच्यावर वाशिम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांचा चुलत भाऊ समीर वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संजय वानखेडे यांनी वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली होती . मात्र, समीर वानखेडे यांनी स्वत: प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी समीर वानखेडे यांनी स्वत: वाशिम न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्याची सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी झाली. यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. वाशिम शहर पोलीस ठाण्याचे एसएचओ रऊफ शेख यांनी सांगितले की, समीर वानखेडे याचा भाऊ संजय वानखेडे यांच्या फिर्यादीवरून १६ नोव्हेंबरच्या रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर वानखेडे एनसीबी अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई खोटी असल्याचे म्हटले होते. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करत त्यांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीयवादी टिप्पणी केली होती. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ यूट्यूबसह टीव्ही आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर संजय वानखेडे यांनी पोलिसांत धाव घेतली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. यानंतर ते कोर्टात पोहोचले. या प्रकरणी नवाब मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

हे ही वाचा:

रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार

गॅस सिलिंडर चोरीविरोधात सरकारचा आता ‘कोड’वर्ड

‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’

धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना

मलिक ईडीच्या ताब्यात 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकला अंमलबजावणी संचालनालयाने २३ फेब्रुवारी २०२२रोजी अटक केली होती. तो सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यामुळे आधीच ईडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिक यांची सुटका झाली तरी या नव्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत भर पडू शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,973अनुयायीअनुकरण करा
52,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा