28 C
Mumbai
Sunday, November 16, 2025
घरक्राईमनामाअणुशास्त्रज्ञांशी संबंध, पाकिस्तान प्रवास, दिल्लीत गुप्तहेराला अटक!

अणुशास्त्रज्ञांशी संबंध, पाकिस्तान प्रवास, दिल्लीत गुप्तहेराला अटक!

पोलिसांकडून अधिक तपास सुरु 

Google News Follow

Related

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने एका मोठ्या कारवाईत ५९ वर्षीय मोहम्मद आदिल हुसैनी याला हेरगिरी आणि बनावट पासपोर्ट रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, हुसैनीचे परदेशातील अणुशास्त्रज्ञांसह काही संशयास्पद संपर्क होते आणि त्याने संवेदनशील माहिती परदेशात पुरवली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सूत्रांनुसार, आदिल हुसैनी याने सय्यद आदिल हुसैनी, नसीमुद्दीन आणि सय्यद आदिल हुसैनी अशा विविध नावांचा वापर करत पासपोर्ट तयार करून पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये प्रवास करत होता. तपासात उघड झाले की त्याच्याकडे एक मूळ आणि दोन बनावट भारतीय पासपोर्ट होते. त्याचबरोबर, संवेदनशील संस्थांशी संबंधित तीन बनावट ओळखपत्रे देखील त्याने मिळवली होती.

चौकशीत हुसैनीने कथितपणे कबूल केले आहे की त्याने एका रशियन शास्त्रज्ञाकडून अणुऊर्जेशी संबंधित काही डिझाइन्स मिळवले आणि ते इराणमधील एका शास्त्रज्ञाला विकले. या व्यवहारातून त्याला मोठी रक्कम मिळाली असून, त्या पैशांपैकी काही भाग त्याने दुबईतील मालमत्तेत गुंतवला आणि उर्वरित रक्कम खर्च केली, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

विशेष शाखेच्या माहितीनुसार, हे रॅकेट झारखंडमधील जमशेदपूर येथून कार्यरत होते, जिथे बनावट ओळखपत्रे आणि पासपोर्ट तयार केले जात होते. या प्रकरणात हुसैनीचा भाऊ अख्तर हुसैनीलाही मुंबई पोलिसांनी स्वतंत्रपणे अटक केली आहे. अख्तरने आखाती देशांमध्ये प्रवास करून बनावट ओळखपत्रे मिळवण्यास मोठी मदत केली होती.

तसेच, या रॅकेटशी संबंधित आणखी एक संशयित जो कॅफे चालवत होता त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, काही आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस आता या नेटवर्कद्वारे किती लोकांनी बनावट पासपोर्ट मिळवले याची चौकशी करत आहेत.

हे ही वाचा : 

नेतन्याहू यांच्या इशाऱ्यानंतर झालेल्या गाझामधील हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू

“भारत- पाकिस्तान संघर्षात सात नवीन, सुंदर लढाऊ विमाने पाडण्यात आली”

पाक संरक्षण मंत्री म्हणतात, “काबुल भारताचा कठपुतली झालाय!”

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण!

दिल्लीतील न्यायालयाने आदिल हुसैनीला सात दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६१(२) (गुन्हेगारी कट), ३१८ (फसवणूक), ३३८  (मौल्यवान सुरक्षेची बनावटगिरी) आणि ३४०  (खोट्या कागदपत्रांचा वापर) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त (विशेष कक्ष) प्रमोद सिंग कुशवाह यांनी सांगितले, “हे रॅकेट अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे दिसून येते. यात सहभागी इतर काही लोकांचीही चौकशी सुरू आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा