28 C
Mumbai
Saturday, November 26, 2022
घरक्राईमनामादादरचे प्रसिद्ध 'सुविधा' शोरुमच्या संचालकाची आत्महत्या

दादरचे प्रसिद्ध ‘सुविधा’ शोरुमच्या संचालकाची आत्महत्या

कल्पेश मारू यांनी यादी चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Google News Follow

Related

मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध शोरूम ‘सुविधा’ चे संचालक कल्पेश मारू (४६) यांनी आत्महत्या केली आहे. मुंबई- अहमदाबाद मार्गावरील शिरसाट फाट्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. आत्महत्येची घटना ही दोन दिवसांपूर्वीच घडली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात दोन दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह कल्पेश मारु यांचाच असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मृतदेहाला लागूनच एक थम्सची बॉटल, एक बॅग पोलिसांना सापडली असून, त्यात बॅग मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, आय फोन, व एक गोळ्यांचे रिकामे पॉकेट मिळून आले होते. यावरून त्याची ओळख पटली आहे. ओळख पटल्यानंतर घटनेची माहिती पोलीसांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली होती.

कल्पेश मारू यांनी यादी चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एकवेळा त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यावेई त्यांना पोलिसांनी वाचवले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी दिली आहे.कल्पेश मारू हा मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

हे ही वाचा:

धमकी आलेला ‘तो’ नंबर पाकिस्तानमधल्या इम्तियाजचा

मुंबई मे हमला होने जा रहा है, २६-११ की याद दिलाएगा

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

‘फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू’

दादर पोलीसांनी घटनेची नोंद करुन घेतली असून पुढील तपास सुरु आहे. मारू कुटुंबीय हे शिवाजीपार्क दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,978अनुयायीअनुकरण करा
52,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा