29 C
Mumbai
Thursday, August 27, 2026
घरक्राईमनामातरुण तेजपाल यांना दोन आठवड्यांत शरण येण्याचे आदेश

तरुण तेजपाल यांना दोन आठवड्यांत शरण येण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Google News Follow

Related

२०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेले ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावलेल्या १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेपासून तात्पुरती सूट देत शरणागती टाळण्याची मागणी करणारी तेजपाल यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच त्यांना दोन आठवड्यांच्या आत शरण येण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने तेजपाल यांना दोन आठवड्यांत शरण येऊन त्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांच्या दोषसिद्धी आणि शिक्षेविरोधातील अपीलवर सुनावणी होणार आहे. तेजपाल यांच्या अपीलवर २२ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता असून, त्यासाठी शरणागतीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. तेजपाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. मात्र, गोवा सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दोषी व्यक्तीने शरण न जाता अपील दाखल करता येणार नसल्याचा युक्तिवाद केला.

हे ही वाचा:

अपात्रता याचिकेसंदर्भात तृणमूलच्या २० बंडखोर खासदारांना नोटीस

“नंदीग्रामच्या हरिपूरमध्ये ८६% हिंदू, तरी घरकुल योजनेची ५४ पैकी ५२ घरे मुस्लिमांना”

परीक्षेच्या मागण्यांवरून पाटण्यात विद्यार्थी रस्त्यावर

सुनील शुक्रे महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त

यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तेजपाल यांना २०१३ च्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाद्वारे न्यायालयाने पाच वर्षांपूर्वी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्दोष मुक्ततेचा निर्णय उलटवला होता. या निर्णयाला आव्हान देत तेजपाल यांनी २० ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, अपीलवर सुनावणी होण्यापूर्वी शरण येण्याच्या अटीतून सूट मिळावी, अशी त्यांची मागणी होती. ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा