25 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरक्राईमनामापुण्यात कोयता गँगचा हैदोस, सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला !

पुण्यात कोयता गँगचा हैदोस, सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला !

दोघांना अटक

Google News Follow

Related

पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगने हैदोस घातला आहे. कोयता गँगकडून सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड गेले होते. कारवाई दरम्यान पोलीस अधिकाऱ्यावरच टोळीने कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी  झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दोन गुंडांना अटक करण्यात आले आहे. त्यापैकी एकाचे निहाल सिंग असे नाव आहे.

हे ही वाचा :

दिल्ली: विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’ला धक्का, पाच नगरसेवक भाजपात !

चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) अध्यक्षपदी फेरनिवड

पंतप्रधान मोदींनी ‘लखपती दिदीं’शी साधला संवाद !

आंदोलनात ‘सर तन से जुदा’ घोषणा देणाऱ्या ३०० जणांवर गुन्हा

दरम्यान, पुण्यामध्ये कोयता गँगच्या बातम्या सारख्या समोर येत आहेत. यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. परंतु, एका पोलीस निरीक्षकावरच हल्ला केल्याने कोयता गँगचा वाढलेला हैदोस यामधून स्पष्ट होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा