बांगलादेशप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. मागील काही दिवसांपासून हिंदूंच्या मंदिरांवर कट्टरवाद्यांकडून हल्ले केले जात आहेत. अशा घटना वारंवार समोर येत असूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हातवार हात ठेवून शांत बसल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कट्टरवाद्यांवर कोणतीही कठोर कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. अशातच आणखी एक हल्ल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शुक्रवारी (२३ मे) काही अज्ञात कट्टरपंथीयांनी पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील हलिसहर शहरातील एका हिंदू मंदिरावर हल्ला केला आणि गर्भगृहात ठेवलेले शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला. या काळात कट्टरपंथीयांनी पूजेसाठी ठेवलेल्या वस्तूही नष्ट केल्या. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पूजा साहित्य विखुरलेले दिसत आहे.
याबाबत माहिती देताना स्थानिक म्हणाले, हल्लेखोराने जड वस्तूने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पूर्णपणे तोडू शकला नाही. राजकारणी अर्जुन सिंह यांनी ट्विटरवर ट्विट केले की, “हा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी वेढलेला आहे, परंतु अद्याप कोणत्याही गुन्हेगाराला अटक केलेली नाही. यावरून पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सहज समजू शकते.”
हे ही वाचा :
भारतीय जूनियर महिला हॉकी टीमने चार देशांच्या मैत्रीपूर्ण स्पर्धेत चिलीवर थरारक विजय
आर्सेनलच्या महिलांनी बार्सिलोना हरवून महिला चॅम्पियन्स लीग जिंकली
श्रीकांत खिताबापासून राहिला अलिप्त, मलेशिया मास्टर्समध्ये उपविजेता
“धोनी म्हणतोय – भारतासाठी खेळण्यानंतर IPL हा सर्वोत्तम रंगमंच!”
ते पुढे म्हणाले, पश्चिम बंगाल पोलीस प्रशासनातील कोणताही व्यक्ती हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेची काळजी घेत नाही. या घटनेत सहभागी असलेल्या दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मी मागणी करतो.
This is the video of the temple located at Baidyapara Ghat in Halisahar Police Station under @bkpcitypolice.
The temple was vandalised last night.
Though the area is surrounded by the CCTV cameras but no culprit has been arrested yet.
One can easily understand the law and order… pic.twitter.com/HZIu5Pr90C— Arjun Singh (@ArjunsinghWB) May 24, 2025
