34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरक्राईमनामाफेरीवाला बनला ड्रग्स पुरवठादार, मग गावला एनसीबीच्या जाळ्यात!

फेरीवाला बनला ड्रग्स पुरवठादार, मग गावला एनसीबीच्या जाळ्यात!

अन्सारी हा एका बड्या ड्रग्स सिंडिकेटचा हिस्सा असल्याची माहिती समोर आली आहे.

Google News Follow

Related

रस्त्यावर फेरीचा व्यवसाय करणारा फेरीवाला आयजीएन अन्सारी आणि त्याच्या दोन सहकाऱ्याना ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने ड्रग्स पुरवठा प्रकरणात भिवंडी शहरातून अटक केली आहे. एनसीबीने त्याच्या जवळून २ किलो मफेड्रोन या अमली पदार्थांसह ३६लाख रुपयांची रोकड आणि १४७ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

अटक करण्यात आलेला अन्सारी हा एकेकाळी भिवंडी शहरात रस्त्यावर फेरीचा व्यवसाय करीत होता, त्यानंतर तो त्याच विभागात सर्वात मोठा ड्रग्स पुरवठादार बनला असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकारी यांनी दिली. अन्सारीसाठी काम करणारे पीएस वीर आणि रोहन के या दोघांना एनसीबीने प्रथम ड्रग्सपुरवठा प्रकरणी अटक केली. त्यानंतर या दोघांचा बोलवता धनी असलेला अन्सारी याला अटक करण्यात आली. अन्सारी हा एका बड्या ड्रग्स सिंडिकेटचा हिस्सा असल्याची माहिती समोर आली आहे.

नार्कोटिक्स कॅट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या अधिकाऱ्याना ठाणे जिल्ह्यात एक मोठे ड्रग्स सिंडिकेट कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. एनसीबीच्या अधिकारी यांनी याबाबत गुप्त माहितीदाराच्या मदतीने अधिक माहिती मिळवली असता भिवंडी शहरात आयजीएन अन्सारी नावाची व्यक्ती ड्रग्स सिंडिकेटचा एक भाग आहे, हे स्पष्ट झाले. एनसीबीने त्याच्यावर पाळत ठेवली असता अन्सारी हा मुंबईतील एका ड्रग्स माफियाच्या माध्यमातून ड्रग्सचा मोठा पुरवठा करणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकारी यांना होती.

 

रविवारी ड्रग्सची (अमली पदार्थ)ची खेप घेण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळताच एनसीबीच्या अधिकाऱ्यानी भिवंडी परिसरात सापळा रचला व ड्रग्सची खेप घेण्यासाठी येणाऱ्या पीएस वीर आणि रोहन के या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांजवळून एनसीबीने २ किलो मफेड्रोन (म्याव म्याव) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या दोघांकडे केलेल्या चौकशीत हा अमली पदार्थ अन्सारी याला देण्यात येणार होता, अशी माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने अन्सारी याच्या भिवंडीतील घरावर छापा टाकून अन्सारी याला अटक करून त्याच्या घरातून ३६ लाख रुपयांची रोकड व १४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

हे ही वाचा:

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन!

सध्याची कोरोना लाट १५ मेपर्यंत संपणार

केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी

जन्मदिनीच झाला पुनर्जन्म!! भिवंडी दुर्घटनेत २० तासांनंतरही तो राहिला जिवंत

 

अन्सारी याच्या घरातून जप्त करण्यात आलेली रक्कम आणि दागिने अमली पदार्थ विक्रीतून आली असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ४ ते ५ वर्षांपूर्वी अन्सारी हा भिवंडी शहरात रस्त्यावर फेरीचा व्यवसाय करीत होता, त्यानंतर त्याने भिवंडीत किरकोळ अमली पदार्थ विक्री सुरू केली, आणि हळूहळू तो ठाणे जिल्ह्यातील मोठा ड्रग्स पुरवठादार बनला अशी माहिती एनसीबीने दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा