29 C
Mumbai
Wednesday, July 8, 2026
घरक्राईमनामाशोपियान मध्ये 'लष्कर'च्या टॉप कमांडरला घातल्या गोळ्या

शोपियान मध्ये ‘लष्कर’च्या टॉप कमांडरला घातल्या गोळ्या

पाच दिवसांचे ऑपरेशन, सुरक्षा दलांना मोठे यश

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LeT) चा वरिष्ठ कमांडर झाकीर गनई याला चकमकीत ठार केले. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या व्यापक दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. झाकीर गनईचा मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आला असून, त्याचा साथीदार लतीफ याचा शोध अद्याप सुरू आहे.

सुरक्षा यंत्रणांनी झाकीर याला ‘ए++’ श्रेणीचा दहशतवादी म्हणून वर्गीकृत केले होते. झाकीरच्या मृत्यूची पुष्टी झाल्याने, आता शोधमोहीम लतीफ भट्ट नावाच्या दुसऱ्या लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्याला शोधण्यावर केंद्रित झाली आहे.

३ जुलै रोजी शोपियानमधील दाट सफरचंद बागांमध्ये बसविण्यात आलेल्या निगराणी कॅमेऱ्यांमध्ये दोन दहशतवाद्यांच्या हालचाली प्रथमच कैद झाल्या होत्या. त्यामध्ये झाकीर गनई आणि त्याचा साथीदार लतीफ असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी ओळखले. त्यानंतर भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांनी संयुक्तपणे मोठे शोध अभियान सुरू केले.

सुरक्षा दलांनी शोपियानमधील सैदपोरा परिसरासह सात गावांना वेढा घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू ठेवला होता. परिसरातील दाट बागा आणि जंगलाचा फायदा घेऊन दहशतवादी पसार होऊ नयेत म्हणून सर्व बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले. भारतीय लष्कराच्या विशेष व्हिक्टर फोर्सने संपूर्ण परिसर सील केला होता. रात्रीच्या वेळीही शोधमोहीम अखंड सुरू राहावी म्हणून विशेष प्रकाशयोजनाही करण्यात आली होती.

बुधवारी (८ जुलै) सकाळी सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचताच चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत झाकीर गनई ठार झाला. घटनास्थळावरून त्याचा मृतदेह, शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. दुसरा दहशतवादी लतीफ अद्याप परिसरात लपून बसल्याचा संशय असून त्याचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा:

बंगालमध्ये बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार

“केवळ मुंबई महानगरपालिकेला दोष देता येणार नाही, नागरिकही जबाबदार”

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

इराणला तेलविक्रीवर दिलेली सूट रद्द; होर्मुझ हल्ल्याचा दणका

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. गुप्तचर माहितीच्या आधारे सातत्याने शोधमोहीमा राबवल्या जात असून, स्थानिक तसेच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कवर कारवाई केली जात आहे. झाकीर गनईच्या मृत्यूला या मोहिमेतील महत्त्वाचे यश मानले जात असून, आता त्याचा साथीदार लतीफला पकडण्यासाठी शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा