31 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरक्राईमनामाफुकेतला चाललेली २१ कोटींच्या केटामाइनची तस्करी उधळली

फुकेतला चाललेली २१ कोटींच्या केटामाइनची तस्करी उधळली

मुंबई विमानतळावरून एकाला बेड्या

Google News Follow

Related

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) ड्रग्ज तस्करीविरोधात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल २१ कोटी रुपये किंमत असलेले ७ किलो संशयित ‘केटामाइन’ हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी फुकेत (थायलंड) येथे जाणाऱ्या एका प्रवाशाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई विमानतळावरून फुकेतसाठी उड्डाण करणाऱ्या एका संशयित प्रवाशाला एआययूच्या (AIU) अधिकाऱ्यांनी विमानामध्ये चढण्याच्या तयारीत असताना रोखले. संशय बळावल्याने संबंधित प्रवाशाला आणि त्याच्या साहित्याला (बॅगेज) विमानातून खाली उतरवून त्याची सखोल तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान प्रवाशाच्या सामानामध्ये लपवून ठेवलेला ७ किलो वजनाचा पांढरा संशयित पदार्थ आढळून आला. प्राथमिक तपासणीत हा पदार्थ ‘केटामाइन’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे अमली पदार्थ एनडीपीएस कायद्यांतर्गत (NDPS Act, 1985) सायकोट्रॉपिक पदार्थांच्या श्रेणीत येते. काळ्या बाजारात या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे २१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

भारत-कॅनडा व्यापाराला मिळणार नवी गती

फ्लाय दुबईचा ‘तो’ हल्लेखोर वैमानिक जिहादी विचारसरणीचा

पूर्णेकर हत्याकांडाचे धागेदोरे मीरा रोडपर्यंत

दुसऱ्या ९/११ चे लक्ष्य काय? अब्राहम अकॉर्ड की IMEC

कस्टम्स अधिकाऱ्यांनी या प्रकरणी संबंधित प्रवाशाला एनडीपीएस कायद्यातील विविध कलमांन्वये अटक केली असून अमली पदार्थ जप्त केले आहेत. ही तस्करी नेमकी कोणाच्या सांगण्यावरून केली जात होती आणि यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे का, याचा अधिक तपास कस्टम्सचे पथक करत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा