29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर क्राईमनामा दोन जिवलग मैत्रिणींनी एकत्रच कवटाळले मृत्यूला

दोन जिवलग मैत्रिणींनी एकत्रच कवटाळले मृत्यूला

Related

लहानपणापासून एकत्र बागडलेल्या दोन जिवलग मैत्रिणींनी एकत्रच मृत्यूला कवटाळल्याची हृदय पिवटळून टाकणारी धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात उघडकीस आली. या घटनेमुळे मुरबाड तालुक्यातील केळणी गावावर शोककळा पसरली आहे. या दोघींनी एकत्रपणे केलेल्या आत्महत्येमुळे गावात उलटसुलट चर्चा रंगली असली तरी या दोघीपैकी एक वर्षभरापासून आजारी होती अशी माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

या दोन्ही मैत्रिणींची नावे शारदा अंबिज आणि मनिषा निरगुडे अशी आहेत. १८ व १९ वयोगटातील या दोघी एकमेकांच्या नात्यातील असून बालपणाच्या जिवलग मैत्रिणी होत्या. मुरबाड तालुक्यातील केळणी या गावातील आदिवासी पाडा या ठिकाणी या दोघी आपल्या कुटुंबियांसह राहत होत्या.

हे ही वाचा:

मुंबई तुंबण्याला जबाबदार मुख्यमंत्री की मुंबई महापालिका?

आता किमान पावसाची जबाबदारी मोदींवर ढकलू नका

चित्रा वाघ यांनी दिली विद्या पाटील कुटुंबियांना एक लाखाची मदत

महापालिकेचे दावे १२ तासांत धुवून निघाले

शुक्रवारी या दोघी घरच्यांना आम्ही रानात जातो असे सांगून घराबाहेर पडल्या मात्र त्या परत आल्याच नाहीत. सोमवारी परिसरातील काही आदिवासी तरुण याच जंगल भागात रानभाज्या आणण्यासाठी गेले असताना त्यांना शारदा आणि मनिषा या दोघींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

या तरुणांनी याची कल्पना गावातील लोकांना दिल्यानंतर अख्खे गाव जंगलात गोळा झाले. दरम्यान या घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघींचे मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आले असून दोघींचे मृतदेह तपासणीसाठी मुंबईतील जे. जे रुग्णालयात पाठवण्यात आले होते, अशी माहिती मुरबाड पोलीस ठाण्याचे अधिकारी बोराटे यांनी दिली.

या दोघींचे मृतदेह एकत्र झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळून आल्यामुळे या दोघींसोबत काही विचित्र प्रकार तर घडला नसावा ना अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू होती. मात्र तसले काही झालेले नसून या दोघींनी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासवरून स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बोराटे यांनी दिली. या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या, तर त्यापैकी एक वर्षभरापासून आजारी होती, तर दुसरीला कामाचा अधिक ताण असल्यामुळे दोघींनी आत्महत्या केली असावी असे प्रथमिकदृष्टया तपासात समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा