31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणमुंबई तुंबण्याला जबाबदार मुख्यमंत्री की मुंबई महापालिका?

मुंबई तुंबण्याला जबाबदार मुख्यमंत्री की मुंबई महापालिका?

Google News Follow

Related

बुधवारी पावसाने मुंबईला धुवून काढल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झालेली पाहायला मिळाली. यावरून राज्यातला मुख्य विरोधी पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांच्या विरोधात टीकेच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारमधी मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला असून ‘मुंबई तुंबण्याला जबाबदार मुख्यमंत्री की मुंबई महापालिका?’ असा खडा सवाल विचारला आहे.

बुधवार, ९ जून रोजी कोसळलेल्या पावसामुळे मुंबईच्या विविध भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विसकळीत झालेले पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. पहिल्याच पावसात मुंबईची ही अवस्था महापालिकेच्या नालेसफाई आणि नियोजनाच्या दाव्यांमधला फोलपणा दाखवून गेली.

हे ही वाचा:

आता किमान पावसाची जबाबदारी मोदींवर ढकलू नका

सेलिब्रिटीजच्या मुंबई प्रेमावर नितेश राणे बरसले

मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु

ठाकरे सरकारची निष्क्रियता; अस्मिता योजनेचा उडाला बोजवारा

यावरूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट करत त्यांनी सरकार आणि प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. अनिल परब एकदा म्हणाले होते की मुंबईत पाणी तुंबले तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील. मग अनिल परब यांनी सांगावे की आज मुंबईत पाणी तुंबले त्याला जबाबदार मुख्यमंत्री की मुंबई महापालिका? असा प्रश्न दरेकरांनी उपस्थित केला आहे.

आजच्या मुंबईच्या अवस्थेसाठी दरेकर यांनी महापालिकेवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. वेळेत पूर्ण न झालेले प्रकल्प आणि महापालिकेचा नियोजनशून्य कारभार यामुळेच मुंबईची ही अवस्था झाली आहे असे दरेकर म्हणाले. प्रशासनाकडून सांगताना हाय टाईड आणि मुसळधार पावसाचे कारण पुढेच करून मुंबई तुंबल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही गोष्टी मुंबईसाठी नवीन नाहीत. त्यामुळे मुंबईत साचलेल्या पाण्याची संपूर्णपणे जबाबदारी महापालिकेची आहे असे प्रवीण दरेकर यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता तरी महापालिकेने योग्य त्या उपाययोजना करत तुंबलेल्या पाण्याचा निचरा करून मुंबईकरांचे जनजीवन सुरळीत करावे अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा