31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरक्राईमनामाबुलंदशहरमध्ये शेतात बांधलेल्या घरात भीषण स्फोट, चार जणांचा मृत्यू

बुलंदशहरमध्ये शेतात बांधलेल्या घरात भीषण स्फोट, चार जणांचा मृत्यू

घरातल्या रासायनिक फॅक्टरीत स्फोट झाल्याचा पोलिसांचा संशय

Google News Follow

Related

उत्तरप्रदेशातल्या बुलंदशहरच्या कोतवाली नगर भागात झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे . शेताच्या मध्यभागी बांधलेल्या घरात हा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की घराचे छत उडून गेले. स्फोटाचा आवाज कित्येक किलोमीटर दूर ऐकू येत होता . या स्फोटात मृतांच्या शरीराचे भाग दूरवर विखुरले गेले होते. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ज्या घरात स्फोट झाला ते घर कोसळले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबल्याचा संशय आहे. ही घटना नगर कोतवाली परिसरातील ढिकोली रोडवर कारखाना सुरू असलेल्या घरात घडली. घराच्या आत एक रसायनांचे उत्पादन फॅक्टरी सुरू होती. त्याचा स्फोट झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळावरून सिलेंडरचे तुकडेही जप्त करण्यात आले आहेत.ज्या घरामध्ये स्फोट झाला ते घर पीडितांनी भाड्याने घेतले होते .

स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत ऐकू आला.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत . फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक लोक बचावकार्यात पोलिसांना मदत करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत चार मृतदेह ताब्यात घेतले आहेत. अभिषेक (२०), रईस (४०), आहाद (०५) आणि विनोद अशी मृतांची नावे आहेत.

हे ही वाचा:

‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात

पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात

संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले

रामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा

आम्हाला शेतातील एका घरात स्फोट झाल्याची माहिती मिळाली. आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो आणि ४ मृतदेह बाहेर काढले आहेत . संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे,  असे पोलिसांनी म्हटले आहे.

हा स्फोट रासायनिक कारखान्याचा पुरवठा करणाऱ्या अधिकृत वितरकाचा होता. स्फोटानंतर केमिकल वितरक राजकुमार फरार झाला आहे. पोलिसांनी राजकुमारचा भाऊ प्रमोद याला अटक केली आहे. घटनास्थळी सापडलेल्या अॅमेझॉन रॅपरवर लिहिलेल्या जीएसटी क्रमांकावरून कारखान्याच्या मालकाची ओळख पटली आहे. राजकुमारच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक ठिकठिकाणी छापे टाकत आहे. तपासानंतर जे काही कारण समोर येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा