29 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरक्राईमनामादहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक

दहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक

उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली असून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली असून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयित दहशतवाद्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. इसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या एकाला उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला दहशतवादी संघटना टार्गेट करून दहशतवादी कारवाया घडवू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एटीएसने असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमचा सदस्य सबाउद्दीन आझमी याला लखनऊ मुख्यालयात चौकशी केल्यानंतर अटक केली. आझमीने त्याच्या चौकशीदरम्यान दिलावर खान आणि बैराम खान अशी आणखी दोन संशयित दहशतवाद्यांची नावे घेतली आहेत.

आझमी हा ISIS या दहशतवादी संघटनेमध्ये भरती करणाऱ्याच्या थेट संपर्कात होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. एटीएसने आरोपी आझमीकडून बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेली सामग्री, एक बेकायदा शस्त्र आणि काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी क्रिकेटपटू जडेजाचं पत्र लिहून केलं कौतुक

पाकिस्तान, श्रीलंकेच्या वाटेवर बांगालादेश

खेळाडूंची पुढची पिढी तयार होतेय, ‘तो’ व्हिडीओ बघून आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया

संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या

ISIS च्या विचारधारेने प्रभावित झालेला आझमी हा जिहादी तत्वांचा प्रसार करत आहे तसेच तो इतर तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी गुप्त माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आझमीला ताब्यात घेतले. यावेळी त्याचे ISIS शी संबंध असल्याचे पुरावे सापडले.

तसेच फेसबुकवर बिलाल नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर आझमीने काश्मीरमध्ये होणाऱ्या कारवाईबद्दल संभाषण सुरू केले. बिलालने ISIS चा दुसरा सदस्य मुसा उर्फ ​​खट्टाब काश्मिरी याच्याशी त्याचा संपर्क करून दिला. आझमीचा मुसा आणि त्यानंतर सीरियात राहणाऱ्या ISIS च्या अबू बकर अल-शमीशी संपर्क झाला, असेही पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा