उत्तर प्रदेशमध्ये विशेष कृती दलाला (एसटीएफ) मोठे यश मिळाले असून राज्यातील कुख्यात गुंडांवरील कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे. सोमवारी शामली जिल्ह्यातील झिन्झाना भागात झालेल्या चकमकीत चार दरोडेखोरांचा खात्मा करण्यात एसटीएफला यश आले आहे. या चकमकीत एसटीएफचे निरीक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. यासंबंधीचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील झिन्झाना पोलीस ठाणे परिसरात झालेल्या चकमकीत एसटीएफने चार गुन्हेगारांना ठार केले. यावेळी एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. या गुन्हेखोरांवर एक लाखांचे बक्षीस जाहीर होते. मुस्तफा काग्गा टोळीचा सदस्य अर्शद (रा. सहारनपूर) आणि त्याचे इतर तीन साथीदार मनजीत, सतीश आणि एक अज्ञात साथीदार यांचा या चकमकीत मृत्यू झाला.
अर्शद बेहट, सहारनपूर पोलिस स्टेशनमधून एका दरोड्याच्या गुन्ह्यात हवा होता, त्याच्यावर एडीजी झोनने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अर्शदवर दरोडा आणि खुनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. एसटीएफ मेरठला सोमवारी रात्री उशिरा गुप्त माहिती मिळाली होती की, शामली जिल्ह्यातील झिन्झाना भागात लुटमारीच्या उद्देशाने काही गुंड जात आहेत. यानंतर एसटीएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. माहितीनुसार, जेव्हा पथकाने एक गाडी येताना पाहिली तेव्हा त्यांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला, पण गाडीतील लोकांकडून त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यानंतर एसटीएफच्या पथकाने प्रत्युत्तर दिले. सुमारे ३० मिनिटे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. एसटीएफने मुस्तफा काग्गा टोळीचा सदस्य अर्शद आणि त्याच्या तीन साथीदारांची हत्या केली.
4 miscreants were killed in an encounter by Uttar Pradesh STF in the Jhinjhana area of Shamli district; STF inspector injured
Mustafa Kagga gang member Arshad along with three others- Manjeet, Satish and one unknown accomplice were injured in the encounter. They have succumbed… pic.twitter.com/LmTyOep0wP
— ANI (@ANI) January 21, 2025
हे ही वाचा:
मुंबई सेंट्रलला रेल्वे पोलिसांनी पकडला ‘पुष्पा’
परशुराम हिंदू सेवा संघाची राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न
गायक अमीर हुसेन मगसौदलूला फाशी !
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मार्ग मोकळा
चकमकीदरम्यान एसटीएफ टीमचे नेतृत्व करणाऱ्या इन्स्पेक्टर सुनील यांनाही अनेक गोळ्या लागल्या होत्या. ज्यांच्यावर हरियाणातील कर्नाल येथील अमृतधारा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात पाठवण्यात आले.







