29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामामी आरोपी नाही, मी डिप्रेशनमध्ये आहे... वैभव कदम होते प्रचंड तणावाखाली

मी आरोपी नाही, मी डिप्रेशनमध्ये आहे… वैभव कदम होते प्रचंड तणावाखाली

त्यांच्या स्टेटसमधून वास्तव आले समोर

Google News Follow

Related

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक असलेल्या वैभव कदम या पोलिस कॉन्स्टेबलने रेल्वेसमोर उडी मारून जीव दिला. त्यानंतर त्यांची विविध सोशल मीडियावर ठेवलेली स्टेटस समोर आली आहेत. ते प्रचंड तणावाखाली होते हे त्यातून समोर येते आहे.

आपल्या एका स्टेटसमध्ये त्यांनी लिहिले आहे की, पोलिस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे की, मी आरोपी नाही. दुसऱ्या एका स्टेटसमध्ये त्यांनी लिहिले आहे की, मी डिप्रेशनमुळे हा निर्णय घेत आहे. पुढे ते लिहितात की, एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. त्यांनी या घटनेसाठी कुणालाही दोषी धरलेले नाही. ते लिहितात की, यात कुणाचाही दोष नाही. आपल्या मुलाची ते माफी मागतात. स्वर मला माफ कर. आपल्या पत्नी आणि मुलाची माफी मागणारे एक स्टेटसही दिसते. त्यात ते लिहितात की, साक्षी मला माफ कर. स्वर मला माफ कर. आई, पप्पा मला माफ करा. मी खरंच चांगला नवरा, बाप, मुलगा आणि भाऊ होऊ शकलो नाही.

वैभव कदम यांच्या या आत्महत्येमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर अनंत करमुसे यांना करण्यात आलेल्या मारहाणीवेळी आव्हाड यांचे हे अंगरक्षक करमुसेला उचलून आणण्यासाठी गेल्याचे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला तेव्हा हे सगळे पोलिस आणि इतर सुरक्षा रक्षक आरोपी म्हणून समोर आले. त्यांच्या चौकशी केल्या जाऊ लागल्या.

हे ही वाचा:

राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ममता बॅनर्जींना दिलासा नाहीच

गिरीशजींच्या रूपात एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले!

अफू गांजा, दहशतवाद, खलिस्तानी चळवळीने ग्रासले पंजाबला

वादग्रस्त खासदार मोहम्मद फैजल यांना पुन्हा मिळाली खासदारकी

करमुसे प्रकरणातील आरोपी आणि जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या

त्यातून मग वैभव कदम हे तणावाखाली आले असावेत असे दिसते. या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी सुरू झाल्यावर कारवाईची टांगती तलवार सगळ्यांवरच होती. त्यातून वैभव कदम यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असेल असे म्हटले जात आहे.

वैभव कदम यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटमध्ये त्यांची वैयक्तिक छायाचित्रे, आपल्या कुटुंबासमवेत असलेली छायाचित्रे आहेत. लोक आता त्यांचे आयुष्य नेमके कसे होते हे जाणून घेत आहेत. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटरवर वैभव कदम यांचा मारुती कांबळे झालाय का, असा खणखणीत सवाल उपस्थित केला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा