रामकुमार सारंगपानी हे भारतीय वंशाचे दुबईकर हे नवे विक्रमादित्य ठरत आहेत. १८ नोव्हेंबर २०२० हा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रामकुमार यांनी ८ तासापेक्षा कमी वेळात ६ नवे विक्रम केले. सारंगपानी यांच्या नावे वेगवेगळे १७ विश्वविक्रम आहेत. आयुष्यात १०० विश्वविक्रम करण्याचा त्यांचा इरादा आहे. रामकुमार सारंगपाणी हे सध्या गल्फ परिसरातील सर्वाधिक विश्वविक्रम असणारे व्यक्ती आहेत.
सारंगपानी यांचा महिन्याला एक याप्रमाणे वर्षाकाठी बारा विश्वविक्रम करायचा मानस आहे. या विश्वविक्रमांच्या माध्यमातून दुबईचे नाव उंचावण्याची त्यांची इच्छा आहे. मुळचे चेन्नईचे असणारे रामकुमार हे गेल्या १७ वर्षांपासून दुबईवासी आहे. कोविड काळातील लोकडाऊन हा अनेकांसाठी सकारात्मक ठरला आहे. रामकुमार हे त्यातिलाच एक आहेत. या काळाचा उपयोग त्यांनी विश्वविक्रम करण्यासाठी केला.