27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरक्राईमनामाकूकने वेटरवरच चालवला चाकू आणि...

कूकने वेटरवरच चालवला चाकू आणि…

Related

ग्राहकाने मागितलेली डिश स्वयंपाकीने (कुक) बनवली नाही म्हणून वेटर आणि कुकमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसान भयानक घटनेत घडले.

कुकने वेटरची भोसकून हत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अंधेरीच्या हॉटेल रेसिडेन्सी मध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून कुकला अटक केली आहे.

जगदीश रामसिंग जलाल (४२) असे हत्या करण्यात आलेल्या वेटरचे नाव आहे .जगदीश हा मूळचा उत्तराखंड येथे राहणारा असून मागील काही वर्षांपासून अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील तीन तारांकित हॉटेल रेसिडेंसी मध्ये वेटर म्हणून नोकरीला होता. तर माधव मंडल (२७) हा कुक (स्वयंपाकी) म्हणून किचन मध्ये काम करीत होता. गुरुवारी रात्री हॉटेल मध्ये जेवायला आलेल्या एका ग्राहकाने वेटर जगदीशला एका पदार्थांची ऑर्डर दिली होती, मात्र ती लवकर न मिळाल्यामुळे ग्राहक नाराज होऊन निघून गेला होता.

हे ही वाचा:

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; यादी वाचा सविस्तर

मस्तीत मित्राला दिला धक्का आणि…

गद्दार कोण? राहुल शेवाळे यांनी दिले उत्तर

मुंबईतील महालक्ष्मी मंदिराचा घुमट होणार शुद्ध सोन्याचा

जगदीशने कुक माधव याला तू पदार्थ लवकर बनवून दिला नाही म्हणून ग्राहक नाराज होऊन निघून गेला, असे सांगितले असता दोघांमध्ये भांडण झाले. शुक्रवारी पुन्हा सकाळी या कारणावरून दोघात पुन्हा भांडण झाले या भांडणातून माधव याने स्वयंपाक खोलीतील चाकूने जगदीश याच्यावर वार करून हत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कुक माधव मंडल याला अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा