28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्राईमनामातुनिषा शर्माने आत्महत्या करण्यापूर्वीची ती १५ मिनिटे महत्त्वाची!

तुनिषा शर्माने आत्महत्या करण्यापूर्वीची ती १५ मिनिटे महत्त्वाची!

शिजान खानवरील संशय वाढला

Google News Follow

Related

अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या हा सध्या चर्चेचा विषय असून रोज त्यासंदर्भात नवनवीन माहिती समोर येते आहे. सेटवरच तिने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर खळबळ उडाली. यासंदर्भात तिचा सहकलाकार आणि तिचा कथित प्रियकर शिजान खान याला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात आता नवा खुलासा समोर आला आहे. तुनिषा सकाळी नेहमीप्रमाणे शूटिंगस्थळी दाखल झाली. त्यानंतर तिने ३ वाजता जेवणही घेतले. सोबत शिजान खानही होता. पण तिने ३.१५ ला आत्महत्या केली. तेव्हा त्या १५ मिनिटांत असे काय झाले की, तुनिषाला आत्महत्या करावी लागली? तुनिषाच्या या आत्महत्येची सध्या पोलिस चौकशी करत आहेत.

शिजानच्या मेकअप रूममध्येच तिने आत्महत्या केल्यामुळे त्या १५ मिनिटांतच काहीतरी झाले असले पाहिजे असा संशय व्यक्त केला जात आहे. तुनिषा आणि शिजान यांच्यातील फोन कॉलचा सध्या तपास सुरू असून त्यात झालेल्या बोलण्याची तपासणी पोलिस करत असून त्यातून काही धागेदोरे हाती लागतात का, हे पोलिस बघणार आहेत.

हे ही वाचा:

उपनगरातील भाडेकरू इमारतींना न्याय मिळणार!

मुघलांच्या फौजेला साहिबजादे निर्भयपणे सामोरे गेले! त्यांच्या चरणी नतमस्तक

शिवसेनेचे खासदार , व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणूगोपाळ धूत यांना अटक

प्रेयसीच्या चेहऱ्यावर लाथाबुक्के मारणाऱ्याचे घर केले उद्ध्वस्त

६ महिन्यांपूर्वीपासून तुनिषा आणि शिजान यांच्यात प्रेमसंबंध आहेत, असे कळते. पण १५ दिवसांपूर्वीच दोघांमधील प्रेमसंबंध संपुष्टात आले होते. त्यामुळे तुनिषा ही दडपणाखाली होती का, याचा तपास केला जात आहे. शिजान हाच या आत्महत्येसाठी जबाबदार आहे, असा आरोप तुनिषाच्या आईने केला असून यासंदर्भात जी नवी माहिती समोर आली आहे त्यानुसार आफताब-श्रद्धा प्रकरणानंतर जो लव्ह जिहादचा आरोप झाला त्यामुळे शिजानने तुनिषाशी नाते तोडल्याचे बोलले जात आहे. आता नेमके कोणते कारण आहे, हे येत्या काळात समोर येऊ शकेल. जेव्हा शिजानने तुनिषाशी नाते तोडले तेव्हा तुनिषाला त्याचा त्रास झाला आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा