34 C
Mumbai
Sunday, February 15, 2026
घरक्राईमनामाअल- फलाह विद्यापीठाच्या मालकाच्या मालमत्तेवर चालणार बुलडोझर?

अल- फलाह विद्यापीठाच्या मालकाच्या मालमत्तेवर चालणार बुलडोझर?

अवैध बांधकाम हटवण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे

Google News Follow

Related

दिल्ली बॉम्बस्फोटांचे दुवे हे अल- फलाह विद्यापीठाशी जोडले जात असून तपास यंत्रणांच्या रडारवर सध्या हे विद्यीपीठ आहे. विद्यापीठाचे आर्थिक व्यवहारही तपासले जात असून विद्यापीठाचे मालक जवाद अहमद सिद्दिकी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचा भाऊ हमूद सिद्दीकी यालाही अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील महू येथील अल- फलाह ग्रुपच्या अध्यक्षांच्या कुटुंबाच्या मालकीच्या मालमत्तेवर बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. महू कॅन्टोन्मेंट बोर्डाने जवाद अहमद सिद्दीकीच्या कुटुंबाच्या मालकीच्या निवासी मालमत्तेच्या रहिवाशांना आणि कायदेशीर वारसांना ही नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण दिल्ली बॉम्बस्फोटांच्या चौकशीशी देखील जोडले गेले आहे, कारण अल- फलाह ग्रुपद्वारे चालवले जाणारे फरीदाबादमधील अल- फलाह विद्यापीठ तपासाचे केंद्र बनले आहे.

माध्यमांशी बोलताना कॅन्टोन्मेंट इंजिनिअर एच.एस. कलोया म्हणाले की, जावेद अहमद सिद्दीकीचे वडील दिवंगत मौलाना हम्माद यांच्या घरासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कॅन्टोन्मेंट कायदा, १९२४ अंतर्गत विभागाने १९९६ आणि १९९७ मध्ये बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे वारंवार आदेश दिले होते. तथापि, वारंवार सूचना देऊनही, बांधकाम हटवले गेले नाही. नवीन नोटीसमध्ये आता सध्याच्या रहिवाशांना किंवा कायदेशीर वारसांना तीन दिवसांच्या आत बेकायदेशीर बांधकाम हटविण्याचे निर्देश दिले आहेत. जर या आदेशाचे पालन केले नाही तर कॅन्टोन्मेंट बोर्ड तोडफोडीची कारवाई सुरू करेल. या कारवाईत झालेला कोणताही खर्च कॅन्टोन्मेंट कायद्यातील तरतुदींनुसार संबंधित पक्षांकडून वसूल केला जाईल.

हेही वाचा..

भारताची वाटचाल स्वच्छ ऊर्जेकडे

४ कोटींहून अधिक किमतीचे ८४६.३० नशेचे पदार्थ नष्ट

नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

मानवनिर्मित फायबर, तांत्रिक कापडांची निर्यात वेगाने

१३७१ क्रमांकाची ही मालमत्ता महूच्या मुकेरी मोहल्ला परिसरातील सर्व्हे क्रमांक २४५/१२४५ येथे आहे. महू येथील एका मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांनी जवाद सिद्दीकीचा भाऊ हमूद अहमद सिद्दीकीला हैदराबाद येथून अटक केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २५ वर्षांपूर्वी महू येथे झालेल्या मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचा आरोप हमूदवर आहे. त्याला रविवारी अटक करण्यात आली.

दिल्ली बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी डॉ. उमर अन नबी हा अल- फलाह विद्यापीठात होता. दिल्ली बॉम्बस्फोटातील अनेक संशयितांचे या विद्यापीठाशी संबंध होते असे तपास यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे, तपास यंत्रणा विद्यापीठाचे रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय मंजुरी बारकाईने तपासत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा