25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरक्राईमनामा‘बुल्ली बाई’ प्रकरणातील मास्टरमाईंड होती एक महिला?

‘बुल्ली बाई’ प्रकरणातील मास्टरमाईंड होती एक महिला?

Related

मुस्लिम महिलांच्या फोटोंचा वापर करून त्यांची विक्री ऍपच्या माध्यमातून करणाऱ्या एका इंजिनीअर युवकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी या ‘बुल्ली बाई’ प्रकरणात एका महिलेला ताब्यात घेतले आहे. हीच महिला या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचे कळते.

या प्रकरणात मुस्लिम महिलांचे फोटो ‘लिलावासाठी’ अॅपवर अपलोड करण्यात आले होते. हे सगळे उत्तराखंडमधून चालत होते. आता या महिलेला उत्तराखंडच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नंतर त्या महिलेला मुंबईत आणले जाईल. ट्रान्झिट रिमांडसाठी महिलेला तपासासाठी मुंबईत आणण्यात येत आहे. त्याआधी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल कुमार असल्याचे कळते. त्याला बेंगळुरूतून ताब्यात घेण्यात आले होते.

२१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेंगळुरू येथून सोमवारी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. दोघे या प्रकरणातील सहआरोपी असून एकमेकांना ओळखतात.

ते फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र आहेत. म्हणून त्यांच्यातील दुवे स्थापित केले आहेत. ही महिला बुल्लीबाई अॅपशी संबंधित तीन खाती हाताळत होती. सहआरोपी विशाल कुमार झा याने खालसा सुप्रिमिस्ट नावाने खाते उघडले होते.

हे ही वाचा:

मुस्लिम लॉ बोर्ड म्हणते, सूर्यनमस्कार असंवैधानिक!

लॉकडाऊनसाठी मविआच्या मंत्र्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणारी पालिका अमिताभ बाबत गप्प!

‘जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार’

 

विशाल कुमार याने ३१ डिसेंबरला आपल्या बाकी खात्यांची नावे बदलली आणि शीख धर्माशी मिळतीजुळती नावे ठेवली. लोकांनी फसविण्यासाठी तो गैरहिंदू नावांचा उपयोग करत असे, अशी माहिती समोर आली आहे.

दिल्ली आणि मुंबईत यासंदर्भात एफआयआर दाखल झाल्यानंतर केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्ली व मुंबईतील पोलिसांसह केंद्र सरकार यासंदर्भात पुढील तपास करत असल्याचे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा