26 C
Mumbai
Friday, September 29, 2023
घरक्राईमनामाराजस्थानमध्ये बलात्कारित महिला तासनतास होती रस्त्यावर !

राजस्थानमध्ये बलात्कारित महिला तासनतास होती रस्त्यावर !

भिलवाडा येथे घडली भयानक घटना

Google News Follow

Related

राजस्थानमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.बळजबरीने अपहरण करून एका निर्जन ठिकाणी नेवून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे पीडितेने सांगितले.या प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक.

राजस्थानमधील भिलवाडा येथे शनिवारी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.पीडित महिला फिरायला गेली असताना तिला बळजबरी करून तिचे अपहरण केले आणि शारीरिक शोषण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.महिलेने सांगितले की, बलात्कार झाला त्या ठिकाणाहुन पळ काढण्यात मला यश मिळाले परंतु अंगावरचे कपडे घेऊन जाण्यास शक्य नसल्याने मी नग्न अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत राहिले.अनेक लोकांनी मला पाहिले परंतु एक विकृत स्त्री म्हणून मला त्यांनी मदत केली नाही.तासाभरानंतर काही गावकऱ्यांनी माझे अंग झाकण्यासाठी मला कपडे दिले आणि पोलिसांना कळवले.त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पीडित महिलेचा जबाब नोंदवला.

हे ही वाचा:

ऋषी सुनक यांची पत्नीसह अक्षरधाम मंदिराला भेट !

आमदार रवींद्र वायकर यांनी तथ्य दडपले!

मिर्चीचा ठेचा आणि भाकरी ठाकरेंना पचेल काय ?

पोटनिवडणुकांत भाजपने दाखवली ताकद

महिलेने सांगितले की, अत्याचार करणारे तिघे जण होते त्यापैकी एका आरोपीला ओळखत असल्याचे महिलेने सांगितले. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी छोटू (४२) आणि गिरधारी (३०) यांना अटक केली आहे.घटनेची माहिती मिळताच भिलवाड्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विमल सिंह नेहरा गंगापूरला पोहोचले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.या संदर्भात पोलीस अधीक्षक नेहरा यांनी माहिती दिली ते म्हणाले , गुन्ह्याघडण्यापूर्वी आरोपीने पीडित महिलेला फोन करून भेटायला बोलावले.

मात्र, महिलेने नकार दिला.त्यानंतर संध्याकाळी ७:३० सुमारास महिला फिरायला जात असताना आरोपीने तिला बळजबरीने पकडून तिचे अपहरण केले व तिच्यावर बलात्कार केल्याचे त्यांनी सांगितले.ज्या मोटारसायकलवरून तिचे अपहरण करण्यात आले तसेच गुन्हा घडलेल्या ठिकाणावरून पीडितेच्या तुटलेल्या बांगड्या याचे पुरावे न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) पथकाकडून गोळा करण्यात आले आहे.या महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी शनिवारी रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक कार्यालयाबाहेर अनेकांनी निदर्शने केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा