25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरधर्म संस्कृतीबाप्पाचा आज जन्मोत्सव; माघी गणेशोत्सव

बाप्पाचा आज जन्मोत्सव; माघी गणेशोत्सव

अर्थात 'तीलकुंद चतुर्थी'

Google News Follow

Related

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,

विघ्नविनाशक मोरया

गणपती रक्षी शरण तुला मी

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया,

गणपती बाप्पा मोरया

पौराणिक मान्यते प्रमाणे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला अस म्हणतात. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस म्हणजेच माघ शुद्ध चतुर्थी. यंदा २५ जानेवारी २०२३ बुधवार आपण माघी गणेश जयंती म्हणजेच माघी गणेशोत्सव साजरी करणार आहोत.

गणपतीचे एकूण तीन अवतार समजले जातात. या तीन अवतारांचे तीन जन्म दिवस वेगवेगळे साजरे केले जातात. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो तर दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करूनआपण साजरा करतो तर तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘गणेश जयंती’ म्हणून साजरा करतात.

माघी गणेश जयंती प्रारंभ

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश विनायक चतुर्थी २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी २०२३ रोजी चतुर्थी तिथी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल. माघ महिन्यातील गणेशजन्माला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करावयाची असते. पहिल्यांदा प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. छान सजवलेल्या चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक केला जातो.

गणपतीसह महादेव आणि गौरी अर्थात शिव पार्वतीची तसेच नंदी आणि कार्तिकेयांची पण पूजा करतात. गणपती बाप्पा ला प्रिय असणारी जास्वंदीची लाल फुले, दुर्वा वाहतात. गणपती अथर्वशीषाचे पाठ करून नैवेद्य दाखवतात. .गणेश जयंतीला चंद्र दर्शन निषिद्ध मानले गेले आहे. अस म्हणतात या दिवशीच्या रात्री चंद्र दर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात,अशी धारणा आहे. म्हणूनच कदाचित या दिवशी सकाळी चंद्र उगवतो.

हे ही वाचा:

टाटा एआयजीच्या व्यासपीठावर कारुळकर प्रतिष्ठानचे सांकेतिक भाषा सत्र

कुस्ती अध्यक्ष बृजभूषण प्रकरणाच्या चौकशी समितीची अध्यक्ष मेरी कोम

ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’

‘जन गण मन’ : राष्ट्रगीत एक अभिमान गीत

गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही ‘तीलकुंद चतुर्थी’ म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.हे एक वेगळे व्रत मोक्ष प्राप्तीसाठी करतात. तेव्हा बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया!!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा