25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरविशेष'जन गण मन' : राष्ट्रगीत एक अभिमान गीत

‘जन गण मन’ : राष्ट्रगीत एक अभिमान गीत

२४ जानेवारी १९५० ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला

Google News Follow

Related

राष्ट्रगीत असो वा राष्ट्रध्वज, ते देशवासीयांसाठी प्रेरणा देणारे असते. जे राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. ‘जन गण मन’ राष्ट्रगीत म्हणताना प्रत्येक भारतीयांचा उर अभिमानाने फुलून येतो. आजच्याच दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९५० या गीताला राष्ट्रगीत म्हणून दर्जा देण्यात आला. जाणून घेऊया या देशाच्या अभिमान गीताच्या प्रवासाबद्दल ..

राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर हे राष्ट्रगीताचे लेखक. तर त्याची भाची आणि नोबल पुरस्कार विजेती सरला हिने ते गायले होते. त्यांनी शाळेतील मुलांसोबत बंगाली आणि हिंदीमध्ये हे गाणे गायले. रवींद्रनाथ टागोरांनी ते रचले तेच वर्ष. त्यांनी यापूर्वी बंगाली भाषेत हे गाणे लिहिले होते. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विनंतीवरून आबिद अली यांनी त्याचा हिंदी आणि उर्दूमध्ये अनुवाद केला. मग तो इंग्रजी भाषेतही रचला गेला राष्ट्रगीत प्रथम आझाद हिंद सेनेचे राष्ट्रगीत बनवण्यात आले. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेने ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून घोषित केले.

हे ही वाचा:

देश प्रथम योग्यच, पण द्वेष प्रथमचे काय करायचे?

भाषणे राज ठाकरे, नारायण राणेंची आणि उद्धव, राऊत यांची

बाळासाहेब का म्हणाले, मराठी माणूस मुख्यमंत्री होईल बाकी कुणी नाही?

प्रदीप शर्मांचा जामीन न्यायालयाने नाकारला

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी डिसेंबर १९११मध्ये लिहिलेलं हे राष्ट्रगीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता वार्षिक अधिवेशनात म्हणजेच २७ डिसेंबर १९११ रोजी गायले गेले. असे म्हटले जाते की जानेवारी १९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी संपादित केलेल्या ‘तत्वबोधिनी’ या मासिकात ‘भारत विधाता’ या शीर्षकाखाली हे गाणे पहिल्यांदा प्रसिद्ध झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी १९१९ मध्ये ‘द मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया’ या शीर्षकाखाली इंग्रजीत भाषांतर केले आणि २४ जानेवारी १९५० रोजी त्याच्या हिंदी अनुवादाला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला.

१९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारतीय शिष्टमंडळाकडून राष्ट्रगीताबाबत माहिती मागवण्यात आली होती. त्यानंतर जन गण मनाचे रेकॉर्डिंग हाती लागले. आजचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या कवितेतून घेतले आहे. ही कविता १९११ मध्ये लिहिली गेली. वास्तविक कवितेला ५ पदं आहेत . पण त्यातील पहिले पदं राष्ट्रगीत म्हणून निवडले गेले .

गीतातील अर्थामुळे राष्ट्र गीताचा दर्जा

रवींद्रनाथ टागोरांनी हे गाणे १९१९ मध्ये आंध्र प्रदेशातील बेझंट थिऑसॉफिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदा गायले होते. त्यानंतरच कॉलेज प्रशासनाने सकाळच्या प्रार्थनेसाठी गाणे स्वीकारले. जन गण मन गीतातील अर्थामुळे या गीताला राष्ट्र गीताचा दर्जा देण्यात आला. यातील काही भागांचा अर्थ असा आहे की भारताचे नागरिक, भारतातील लोक तुम्हाला भारताचा भाग्य विधाता मानतात. हे अधिनायक तू भारताचा भाग्य विधाता आहेस. आहेस. यासोबतच गीतामध्ये देशातील विविध राज्यांचा उल्लेख करून त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे अतिशय सुंदर वर्णन करण्यात आले आहेत.

राष्ट्रगीत पूर्ण गाण्यासाठी लागतात ५२ सेकंद

राष्ट्रगीत पूर्णपणे गाण्यासाठी ५२ सेकंद लागतात तर त्याचे व्हर्जन वाजवण्याचा कालावधी सुमारे २० सेकंद असतो.राष्ट्रगीतामध्ये ५ श्लोक आहेत. रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत तर लिहिलेच पण ते गायलेही. हे आंध्र प्रदेशातील मदनपिल्लई या छोट्या जिल्ह्यात गायले गेले.देशाबाहेर प्रथमच ११ सप्टेंबर १९४२ रोजी आझाद हिंद फौजेने जर्मनीच्या हॅम्बुर्ग शहरात भारताचे राष्ट्रगीत म्हणून ‘जन गण मन’ वाजवले.

लाल किल्ल्यावर वाजली जन गण मनाची धून 

१९४५ मध्ये बनलेल्या ‘हमराही’ चित्रपटात याचा वापर करण्यात आला होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ साली लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकावला गेला तेव्हाही राष्ट्रगीत म्हणून जन गण मनाची धून वाजवली गेली.राष्ट्रगीताचे नियम न पाळणाऱ्या आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा-१९७१ च्या कलम-३ अंतर्गत कारवाई केली जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा