20 C
Mumbai
Tuesday, January 24, 2023
घरविशेषकुस्ती अध्यक्ष बृजभूषण प्रकरणाच्या चौकशी समितीची अध्यक्ष मेरी कोम

कुस्ती अध्यक्ष बृजभूषण प्रकरणाच्या चौकशी समितीची अध्यक्ष मेरी कोम

क्रीडा मंत्र्यांनी घोषित केली पाच सदस्यीय समिती

Google News Follow

Related

भारताची जगज्जेती बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम हिची कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी ही घोषणा केली. बृजभूषण यांच्याविरोधात महिला कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत.

ऑलिम्पिक पदकविजेता योगेश्वर दत्त, बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, केंद्र सरकारच्या टॉप या योजनेचे सीईओ राजेश राजगोपालन आणि क्रीडा प्राधिकरणाचे माजी कार्यकारी संचालक राधिका श्रीमान हे या समितीतील इतर सदस्य असतील.

पाच सदस्यांची ही समिती दोन्ही बाजू ऐकून घेईल आणि कुस्तीगीरांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करेल त्यानंतर महिन्याभरात त्याचा अहवाल सादर केला जाईल. तोपर्यंत ही समिती कुस्ती महासंघाचा कारभार हंगामी तत्त्वावर पाहील, असे क्रीडा मंत्र्यांनी म्हटले आहे.

अनुराग ठाकूर यांनी क्रीडा मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या समितीच्या माध्यमातून लैंगिक शोषण, छळ, आर्थिक गैरव्यवहार, प्रशासकीय त्रुटी यांची चौकशी केली जाईल.

हे ही वाचा:

भाषणे राज ठाकरे, नारायण राणेंची आणि उद्धव, राऊत यांची

देश प्रथम योग्यच, पण द्वेष प्रथमचे काय करायचे?

ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’

बाळासाहेब का म्हणाले, मराठी माणूस मुख्यमंत्री होईल बाकी कुणी नाही?

या समितीची नियुक्ती केल्यानंतर कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणीला क्रीडा मंत्रालयाने आदेश दिले आहेत की, रोजच्या कारभारापासून त्यांनी आता दूर राहावे. जोपर्यंत नवे आदेश येत नाहीत तोपर्यंत त्यांनी यात हस्तक्षेप करू नये.

याआधी भारतीय ऑलिम्पिक समितीनेही सात सदस्यीय समितीची स्थापना केली असून त्यातही मेरी कोम व योगेश्वर दत्त हे सदस्य आहेत. त्यात तिरंदाज डोला बॅनर्जी, वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सहदेव यादव, ऑलिम्पिक संघटनेच्या सहसचिव अलकनंदा अशोक, ऍड. तलिश रे आणि श्लोक चंद्रा यांचा या समितीत समावेश आहे. ऑलिम्पिक संघटनेने तयार केलेल्या या समितीचे अध्यक्षपदही मेरी कोमकडे आहे.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात नुकतेच देशातील नामांकित कुस्तीगीरांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले. त्यात बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक या आघाडीच्या कुस्तीगीरांचा समावेश होता. बृजभूषण तसेच प्रशिक्षक, पंच यांच्याकडून लैंगिक शोषण केले जाते, छळ केला जातो, अशा तक्रारी या कुस्तीगीरांनी केल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,923चाहतेआवड दर्शवा
1,992अनुयायीअनुकरण करा
60,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा