अजिंक्य योद्धा आणि सराईघाटच्या युद्धातील महानायक वीर लचित बोर्फुकन यांची जयंती सोमवारी साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या महान अहोम सेनापतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “धैर्य, देशभक्ती आणि खऱ्या नेतृत्वाचे प्रतीक लचित बोर्फुकन यांना आम्ही स्मरतो. त्यांचे शौर्य पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आसामच्या संस्कृतीचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वर लिहिले, “त्यांची अढळ देशभक्ती, अपराजित शौर्य आणि विलक्षण लष्करी नेतृत्वाने केवळ आसाम आणि ईशान्य भारताला मुघल आक्रमणापासून वाचवले नाही, तर या प्रदेशाची समृद्ध सांस्कृतिक परंपराही टिकवली. त्यांचे आयुष्य हे देशभक्तांसाठी सदैव प्रेरणास्थान राहिले आहे.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिहिले, “लचित बोर्फुकन हे अदम्य धैर्य आणि दृढ निश्चय यांचे प्रतीक आहेत—एक असे कमांडर ज्यांनी असामान्य पराक्रमाने आपल्या जनतेचा सन्मान व प्रतिष्ठेचे रक्षण केले. ‘लचित दिवस’ निमित्त मी त्यांच्या शौर्याला वंदन करतो. त्यांची विरासत आमच्यात सतत प्रेरणा निर्माण करते.”
हे ही वाचा:
कॉलेस्टेरॉल कमी करायचंय? मग प्या जास्वंदाचा चहा!
पाच वर्षांच्या साईशा देवलची मल्लखांब स्पर्धेत सोनेरी चमक
५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायमूर्ती सूर्य कांत कोण आहेत?
अस्लम शेखवर गुन्हा दाखल करा! मालवणीत संताप
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी लिहिले, “आपल्या शौर्य आणि साहसाच्या बळावर त्यांनी दाखवून दिले की स्वाभिमान आणि एकतेपुढे कोणतेही साम्राज्य टिकत नाही. लाचित बोर्फुकन हे केवळ असम किंवा ईशान्येचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमान आहेत. त्यांचा संघर्ष कोट्यवधी देशवासीयांना प्रेरणा देतो.”
आासामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “त्यांच्या वीरत्व आणि नेतृत्वाच्या वारशाला पुढे नेत आम्ही त्यांच्या नावाने पोलीस अकादमी, स्मारक, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण संस्थान स्थापन करत आहोत. त्यांचा वारसा आजही आमच्या पिढ्यांना प्रेरित करतो. लचित दिवसाच्या निमित्ताने आम्ही त्या वीर सेनापतीला नमन करतो, ज्यांनी राष्ट्राला कधीही झुकू दिले नाही.”
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिले, “मुघल आक्रमकांच्या अत्याचाराविरुद्ध अद्वितीय धैर्य आणि दूरदर्शी रणनीतीने मातृभूमी व संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या महान सेनानायक लचित बोर्फुकन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली. त्यांचे जीवन आणि त्याग ‘राष्ट्र सर्वोपरि’ या आदर्शाला सजीव करतात आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.”







