31 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरसंपादकीयइराणचे ‘किराना हिल्स’ बचावले…

इराणचे ‘किराना हिल्स’ बचावले…

Google News Follow

Related

जगात जणू दुर्दैवा घटनांची मालिका सुरू आहे. काल गुजरातमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. आज इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. जग गाढ झोपेत असताना इस्त्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ राबवत इराणच्या आण्विक आस्थापना, शस्त्रांचे कारखाने, लष्करी संकूलांना टार्गेट केले. एकाच वेळी हवाई हल्ला, सायबर हल्ला करण्यात आला. ही कारवाई सुरू असताना मोसादने गुप्त मोहीम राबवत इऱाणी लष्कराच्या वरीष्ठ कमांडर्सचा काटा काढला. २०० हून अधिक इस्रायली फायटर जेट्सनी १०० पेक्षा जास्त ठिकाणांना लक्ष्य केले. हल्ला जबरदस्त आणि अचूक होता, तरीही इस्त्रायलवर असलेला धोका शंभरटक्के टळलेला नाही. कारण इराणचा एक मजबूत आण्विक तळ अजून शाबूत आहे.

तुमचा प्रतिद्वंदी, तुमचा शत्रू, तुमच्या वाईटावर उठलेला एखादा व्यक्ति जर ‘तु राहशील कि मी राहीन’, अशी भूमिका घेत असेल तर कोणताही शहाणा, सक्षम आणि शक्तिशाली व्यक्ति त्याला जसे उत्तर देईल तसेच उत्तर आज इस्त्रायलने इराणला दिलेले आहे. ‘आम्हाला संपवण्याचा तुमचा विचार असेल तर आम्ही तर शिल्लक राहूच, परंतु तुमचे अस्तित्व उरणार नाही’, हे इस्त्रायलने आज ऑपरेशन रायझिंग लायन राबवत स्पष्ट केले. अवघ्या तीन तासांत इराणचे १२ वाजवण्यात इस्त्रायलला यश आले.

काय करायचे आहे, याची अचूक योजना इस्त्रायलकडे तयार होती. ते कसे करायचे आहे, त्याचा रोडमॅपही होता. त्यामुळे वेळ न दवडता, झटपट काम उरकून इस्त्रायलची २०० लढाऊ विमाने एखादा ओरखडा आल्याशिवाय मायदेशी परतली. या हल्ल्याचे अत्यंत कडवट उत्तर देऊ असे आयतुल्ला खोमेनी म्हणाले आहेत, परंतु त्यात फारसा दम आहे, असे दिसत नाही.

इस्रायलच्या आजच्या हल्ल्यात इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचा प्रमुख हुसैन सलामी आणि सशस्त्र दलांचे प्रमुख मोहम्मद बाघेरी ठार झालेला आहे. अणु शास्त्रज्ञ फरिदून अब्बासी आणि मोहम्मद मेहदी तेहरांची यांनाही संपवण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक निवासी इमारतीत राहात होते. जेणे करून इस्त्रायलने इथे हल्ला होऊ नये. परंतु आजूबाजूच्यांना ओरखडाही न येता आपले लक्ष्य असलेल्या लोकांना वेचून वेचून ठार कसे करायचे, यात इस्त्रायलने आपली मातबरी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

हे ही वाचा:

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या परीचारीकेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, सरकारी कर्मचारी निलंबित!

…असा वाचला विश्वासकुमार रमेश, एक थरारक कथा!

कानिफनाथ मंदिर, सारसबाग…नमाज, मजारमधून हिंदू संस्कृतीवर घाला

नंबर ३ साठी सुदर्शन योग्य पर्याय

नतांझ, इस्फहान, अराक, तब्रीझ आणि तेहरान येथील अणु संशोधन केंद्र उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. इराणकडे ९ अणुबॉम्बसाठी पुरेसा शुद्ध युरेनियमचा साठा तयार झाला असल्याची मोसादची माहिती होती. ही अण्वस्त्र अर्थातच इस्त्रायलच्या विरोधात वापरण्यात आली असती. ‘इस्त्रायलचे अस्तित्व संपवून टाकू’ अशा प्रकारची विधाने इराणचे सर्वेसर्वा आयतुल्ला खोमेनी यांच्यापासून अनेक इराणी कमांडर्सनी जाहीरपणे केलेली आहेत. त्यामुळे हा लढा उघडपणे इराणच्या अस्तित्वाचा होता. या लढाईकडे इराण-इस्त्रायल युद्ध म्हणून पाहण्यापेक्षा यहूदी विरुद्ध मुस्लीम संघर्ष म्हणून पाहणे अधिक योग्य आहे.

इस्त्रायलच्या निर्मितीनंतर आजूबाजूच्या सहा मुस्लीम राष्ट्रांनी इस्त्रायलवर आक्रमण केले होते. परंतु गेल्या अनेक युद्धांच्या अनुभवानंतर बाकीच्यांना अक्कल आलेली आहे, की, ‘इस्त्रायलशी वाकडे, त्यांची स्मशानात लाकडे’, त्यामुळे बाकीचे आता त्यांच्या नादी लागत नाहीत. इराणची खुमखुमी मात्र अजून सरलेली नाही. खोमेनी जिवंत असेपर्यंत ती सरणारही नाही. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास आरागछी भारतात आले होते. त्या आधी ते पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भेटले होते. ‘तणाव संपवा, संयम बाळगा’, असा सल्ला ते भारताला देत होते. आता त्यांना इस्त्रायलमध्ये जाऊन हा सल्ला त्यांना देण्याचा प्रयत्न करावा, जेणे करून तणाव शांत होईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनीही काल ठामपणे सांगितले होते  की, ‘इराणकडे कोणत्याही परीस्थितीत अण्वस्त्र असता कामा नयेत’. मध्यपूर्वेतील अमेरिकी नागरिकांनी तिथून बाहेर पडावे म्हणून अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने सूचना जारी केली होती. त्यामुळे इस्त्रायल हल्ला करणार हे उघड होते. परंतु ते इतक्या तातडीने घडेल, अशी अपेक्षा कोणी केली नव्हती. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर आपला संबंध नाही, असे स्पष्ट करून अमेरिकेने हात झटकले असले तरी इस्त्रायलने याबाबत अमेरिकेला माहिती दिली होती आणि अमेरिकेचा पाठिंबा मिळवला होता ही बाब उघड आहे.

हवाई हल्ला होत असताना आपले नुकसान होऊ नये यासाठी आधी सायबर हल्ले करून इराणचे लष्करी कमांड आणि हवाई संरक्षण प्रणाली निकामी करण्यात आली होती. हल्ला इतका अचूक होता की, निवासी इमारतीत राहणाऱ्या अणु शास्त्रज्ञांना टीपताना आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले नाही. वेचून वेचून ठार करणे हे असे असते. मोसादने किती अचूक माहिती पुरवली असेल विचार करा. त्यामुळेच या हल्ल्यात फर्डोव्ह सारखे महत्वाचा अणु संशोधन केंद्र कसे सुटले? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारताने केलेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात पाकिस्तानच्या किराना पर्वतराजींजवळ अण्वस्त्रांच्या बंकरला दणका बसला. त्यानंतर इथे बऱ्याच गोष्टी घडल्या. इथे मोठा स्फोट झाल्याचे व्हीडियो व्हायरल झाले. इथे त्यानंतर इथे अणु उत्सर्ग झाल्याची चर्चा होती. इजिप्तने इथे किरणोत्सर्गाचा धोका टाळण्यासाठी बोरोनचा साठा पाठवला, अमेरिकेच्या डीपार्टमेंट ऑफ एनर्जीचे किरणोत्सर्गाचा तपास करण्यासाठी विमान पाठवले. इथे सतत भूकंपाचे धक्के बसतायत, अशीही चर्चा जोरात होती. त्यात तथ्य असण्याची शक्यता आहे, कारण यानंतरच अमेरीकेचे लक्ष इथे वळले होते. ही अमेरिकेची अण्वस्त्र होती, अशीही कुजबुज होती.

इराणकडे आज अण्वस्त्र नसली तरी ही अण्वस्त्र तयार करण्यासाठी जे समृद्ध युरेनियम लागते, त्याच्या निर्मितीची क्षमता असलेले अणुसंशोधन केंद्र कोम येथील पर्वतराजींमध्ये आहे. हे फर्डोव्ह अणुसंशोधन केंद्र इस्त्रायलच्या हल्ल्यानंतरही ते सुरक्षित आहे, असे उघड झालेले आहे. हे सुरक्षित राहीले त्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे ते खडकाळ पर्वतराजींमध्ये दडलेले आहे. शिवाय जमीनीच्या खाली सुमारे ८० ते ९० मीटर आत आहे. तीव्र भूकंपामध्येही ते सुरक्षित राहील अशा प्रकारे त्याची रचना कऱण्यात आलेली आहे.

ऑपरेशन रायझिंग लायनमध्ये फर्डोव्ह का नष्ट झाले नाही, याचे अनेकांना कोडे आहे. कारण इराणचा इतका बारीकसारीक तपशील मोसाद कृपेमुळे इस्त्रायलकडे असताना, फर्डोव्ह अणु संशोधन केंद्रात काय चालते हे त्यांना ठाऊक नसेल हे अशक्य आहे. जमिनीच्या ८० ते ९० मीटर खोल असलेले बंकर नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेले बॉम्ब किंवा क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी इस्त्रायलकडे नसल्यामुळे हे सुरक्षित राहिले असेल का, हे अणुसंशोधन केंद्र अन्य केंद्रांच्या तुलनेत कमी महत्वाचे होते का, असे काही प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत.

कदाचित फर्डोव्हचे अणु संशोधन केंद्र नतांझ किंवा इस्फाह प्रमाणे इंटरनेटशी जोडले नसल्यामुळे हे बचावले असण्याची शक्यता आहे. बंकर उद्ध्वस्त करणारे ३० हजार पाऊंडाचे प्रेसिशन गायडेड जीबीयू-५७ ए/बी हे बॉम्ब अमेरिकेकडे आहेत. अफगाण युद्धाच्या काळात त्याचा भरभरून वापरही करण्यात आला. हे बॉम्ब इस्त्रायलकडे असते तर फर्डोव्हचे काम आजच तमाम झाले असते. परंतु आज झाले नाही, म्हणून ते उद्या होणार नाही, असे मानण्याचे कारण नाही. कारण इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण हल्ल्यानंतर स्पष्ट केलेले आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अजून संपलेले नाही. बहुधा इराणी आण्विक क्षमतेची कंबर साफ मोडल्या शिवाय ते संपणारही नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा