अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या केरळमधील एका परिचारिकेबद्दल फेसबुकवर अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल केरळमधील एका सरकारी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. ए पवित्रन असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो कासरगोड जिल्ह्यातील वेल्लारीकुंडू तालुका कार्यालयातील कनिष्ठ अधीक्षक पदावर काम करत होता. पथानामथिट्टा येथील परिचारिका रंजीता यांची खिल्ली उडवल्याबद्दल त्याला निलंबित करण्यात आले आहे.
राज्याचे महसूल मंत्री के राजन यांनी सरकारी कर्मचारी ए पवित्रन यांची फेसबुक पोस्ट ‘अपमानास्पद’ असल्याचे म्हटले. या पोस्टबद्दल माहिती मिळताच त्वरित कारवाई करत कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यातील तिरुवल्ला येथील रहिवासी रंजिता या यूकेमध्ये परिचारिका म्हणून काम करत होत्या. परदेशात काही काळ घालवल्यानंतर भारतात पुन्हा सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी त्या काही दिवसांसाठी केरळ दौऱ्यावर आल्या होत्या. मात्र, नशिबाने त्यांना सर्वांपासून दूर नेले. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांची आई आणि दोन मुले आहेत. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी रंजिता यांच्या घरी धाव घेतली आणि कुटुंबातील सदस्यांना सांत्वन दिले.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबाची घेतली भेट!
कानिफनाथ मंदिर, सारसबाग…नमाज, मजारमधून हिंदू संस्कृतीवर घाला
शनी शिंगणापूर देवस्थानातून ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!
…असा वाचला विश्वासकुमार रमेश, एक थरारक कथा!
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज घटनास्थळाची पाहणी केली आणि दुर्घटनेत जखमी झालेल्या जखमीं भेट घेतली. या भीषण दुर्घटनेत बचावलेल्या एका प्रवाशाचीही त्यांनी भेट घेतली आणि अपघाताबद्दल विचारपूस केली. यासह गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबाचीही त्यांनी भेट घेतली.
