27.8 C
Mumbai
Wednesday, August 5, 2026
घरसंपादकीयदेशद्रोहाचे समर्थन हा गुन्हा नाही का?

देशद्रोहाचे समर्थन हा गुन्हा नाही का?

Google News Follow

Related

सोशल मीडियाच्या माध्यमातून या देशात देशद्रोही विचारांचा घाऊक प्रमाणात रतीब घातला जातोय. अशा पोस्टविरुद्ध कारवाई होत नसल्यामुळे, ‘यालाच अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणतात’, ‘हे अगदीच नॉर्मल आहे’, ‘यात काहीच गैर नाही’, असे इतरांना वाटणे स्वाभाविक आहे. लोकशाही व्यवस्थेअंतर्गत आपण कायद्याची जी चौकट स्वीकारली आहे, त्यातही अशी अभिव्यक्ती गुन्हेगारी स्वरुपाची मानली गेली आहे. परंतु त्याच लोकशाही व्यवस्थेतील कमकुवतपणामुळे असे लोक गजाआड होण्याऐवजी युवकांचे तथाकथित आय़कॉन बनले आहेत. सौरव दास हे त्याचे खूप मोठे उदाहरण आहे.

कॉकरोच जनता पार्टी हा एक ताजा हिंदूविरोधी, देशविरोधी प्रयोग आहे. या देशबुडव्यांना विद्यार्थ्यांच्या उरावर बसवण्याचे काम काही लोक करतायत. कॉकरोच जनता पार्टी अस्तित्वात येण्यापूर्वी यांचे कारनामे पाहिले तर यांचा हिंदू विरोध, देश विरोध, विदेशी शक्तींशी हातमिळवणी लक्षात यायला फार वेळ लागणार नाही. सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास याने तर वारंवार देशद्रोह्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे समर्थन केले आहे. तरीही त्याच्यावर कारवाई का झाली नाही, हा यक्ष प्रश्न आहे.

जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनप्रकरणी दाखल झालेल्या जनहीत याचिकांच्या संदर्भात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश मान्य नाही, असे सौरव दासने वारंवार सांगितले आहे. लोकशाही व्यवस्था धाब्यावर बसवून अराजकवादी आणि लोकशाही विरोधी प्रवृत्तींचे समर्थन ही याची प्रवृत्ती आहे.

दासच्या एक्स अकाऊंटवर नजर टाकली तरी लक्षात येईल याने उमर खालीदपासून अमृता विल्सनपर्यंत प्रत्येकाच्या देशद्रोहाचे जोरदार समर्थन केले आहे. धर्मांतर करणारे मिशनरी, गजवा ए हिंदवाले जिहादी, अर्बन नक्षली, काश्मीरातील फुटीरवादी सगळ्यांचे हा समर्थन करतो. याला हिंदुत्वाची प्रचंड एलर्जी आहे. देशाच्या विरोधात प्रपोगंडा करणाऱ्यांचा याला पुळका आहे.

२०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० चे उच्चाटन केले. झटका पाकिस्तान आणि काश्मीरातील फुटीरतावाद्यांना बसला. सौरव दासही कळवळला. त्याच्यासारख्या विदेशातील समदु:खींचेही त्याने समर्थन केले.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या ‘नानां’चा भलताच थाट!

भारताच्या कन्यांचा सुवर्णजलवा!

भाजपाच्या बालेकिल्ल्याला प्रशांत किशोरने पाडले खिंडार

अभिमानाचा सुवर्णक्षण; कॉमनवेल्थ २०३०चे यजमानपद भारताकडे!

ब्रिटनमध्ये राहून भारतविरोधी प्रचार करणाऱ्या लेखिका, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता विल्सन यांनी कलम ३७० हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर टीका केली. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मोदी वॉर अगेंस्ट फार्मर हा लेख लिहिला. भीमा कोरेगाव प्रकरणात सहभागी झालेल्या  अर्बन नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईवरही त्यांनी टीका केली. विदेशात बसून भारताच्या विरोधात भुंकलो तर आपले कोणी वाकडे करू शकणार नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे. मोदी सरकारने तो मोडीत काढला आहे.

आयबीने दिलेल्या अहवालाच्या आधारे मोदी सरकारने या बाईवर कारवाई केली. ‘ओव्हरसीज सिटीझनशिप ऑफ इंडिया हे कार्ड’ रद्द केले. हे प्रकरण जेव्हा न्यायालयात गेले, तेव्हा न्यायमूर्तिंनी स्पष्ट शब्दात खडसावले, ‘विदेशात बसून केलेली देशाची बदनामी सहन करता येणार नाही’. सौरव दासने न्यायालयावर ताशेरे ओढले, अमृता विल्सनचे समर्थन केले.
पहलगाम हल्ल्यानंतर नेहा सिंग राठोड नावाच्या भोजपुरी सिंगरने, ‘पुलवामा हमले के नामपर वोट मांगे गये थे, ठिक वैसेही बिहार चुनाव मे पहलगाम के नामपर वोट मांगे जायेंगे…’ अशी पोस्ट केली. तिच्यावर गुन्हा दाखल झाला. तिचेही सौरव दासने समर्थन केले.

ही यादी मोठी आहे, भीमा कोरेगाव प्रकरणात अटक झालेले अर्बन नक्षलवादी सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, गौतम नवलखा, फादर स्टॅन स्वामी, आनंद तेलतुंबडे अशा अनेकांचे सौरव दासने समर्थन केले आहे. यूएपीए अंतर्गत अटक झालेली काश्मीरातील फुटीरवादी खुर्रम परवेझ ज्याचे लष्कर ए तोयबाशी संबंध आहेत. मानवाधिकाराच्या नावाखाली जो दहशतवाद्यांची मदत करत होता. त्याला यूएपीए अंतर्गत अटक कऱण्यात आली. सौरव दासने त्याच्या बाजूने आवाज उठवला. दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी गुलफिशा फातिमा, सीएए आंदोलनातील मीरन हैदर, सफूझा झरगर, अशा अनेक फुटीरवाद्यांच्या काळजीने सौरव दासचे हृदय सतत धडधडत असते.

उमर खालिदचा उल्लेख हा ब्रेव्हेस्ट असा करतो, त्याच्याबद्दल प्रचंड आदर व्यक्त करतो. हा खालिद जेएनयूच्या तुकडे गॅँगचा एक म्होरक्या. २०२ मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीचा एक आरोपी आहे. चिकन नेक भारतापासून कसा तोडता येईल याचे धडे देणाऱ्या शर्जील इमामला इतके दिवस तुरुंगात का सडवले याचे दु :ख सौरव दासला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या मंदीरात दर्शनाला जातात. त्यांचा हातात त्रिशूळ घेतलेला फोटो व्हायरल होतो, तेव्हा सौरव दासला पोटशुळ उठतो. ओडीशात धर्मांतर करणाऱ्या एका पास्टरला बजरंग दलाचे कार्यकर्ते बदडतात तेव्हा याला त्रास होतो. पोलिसांना जंतर मंतर येथे झालेल्या मारहाणीचे मात्र हा समर्थन करतो.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी देशभरातील हिंदू आनंद साजरा करत असतात, तेव्हा याच्या काळजाला चटके बसत असतात. कारण याचे नाव हिंदू असले तरी अंतरंग मात्र पूर्णपणे हिंदू द्रोही. मशिदी खालची मंदीर शोधण्यासाठी इतिहासातील गडे मुडदे उखाडले तर देशातील बंधू भावाचे काय होईल, असा प्रश्न त्याला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी पडतो.

अशा व्यक्तिला कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता बनवण्यात येते ही काही आश्चर्याची बाब नाही. दिपके काय, आशुतोष रांका काय किंवा हा दास काय सर्वच आम आदमी पार्टीच्या अर्बन नक्षल मुशीतून घडलेले आहे. या देशात जे काही वाईट घडते आहे, ते खूप मोठे करून दाखवायचे, जे काही चांगले घडते आहे, त्याचा उल्लेखच करायचा नाही. देशाची सतत सोशल मीडियावर बदनामी करायची हे या गॅंगचे धंदे आहेत.

दिल्ली दंगलीत कपिल मिश्रा याने काय केले याचा खरा-खोटा तपशील सोशल मीडियावर मांडायचा. परंतु आम आदमी पार्टीचा नगरसेवक ताहीर हुसेन याला एका आयबी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी जन्मठेप होते, त्यावर हा मौन. दिपकेने एका पोस्टमध्ये भारतात गुजराती मुस्लीम पंतप्रधान का नाही, असा सवाल केला होता. त्यावरून यांची मानसिकता पुरेशी लक्षात यावी. यांचा हिंदूविरोध टोकाचा आहे. देशावरील हिंदूंचा ठसा पूर्णपणे पुसणे हे यांचे उद्दीष्ट आहे.

सौरव दासने देशद्रोह्यांचे घाऊक समर्थन केलेले आहे. त्यामुळे एक प्रश्न पडतो, या देशात देशद्रोह्यांचे आणि देशद्रोही कृत्यांचे समर्थन करणे हा गुन्हा नाही काय?

अशा कारवायांना अटकाव करणारे कायदे आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. भारतीय न्याय संहिता कलम १५२, १९७, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ एफ, कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. सौरव दासवर ही सगळी कलमे अगदी फिट बसतात. अशा प्रकारची कारवाई होत नाही, तोपर्यंत यांची थोबाडे आणि कारवाया बंद होणार नाहीत. या काट्याचा नायटा होऊन सगळ्या समाजाला लागण होणार नाही, याची काळजी घेणे केंद्र सरकारचे काम आहे. त्याच साठी त्यांच्या हाती सत्ता सोपवण्यात आली आहे. कॉकोरोच अशी असतील तर हिट मारायलाच हवे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा