30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरसंपादकीयसोनिया ISI च्या एजण्ट नाहीत; मग, केजीबीच्या आहेत का ?

सोनिया ISI च्या एजण्ट नाहीत; मग, केजीबीच्या आहेत का ?

देशात बसून गांधी परिवाराचे वस्त्रहरण करणारे स्वामी काँग्रेसला का दिसत नाहीत?

Google News Follow

Related

काँग्रेसवाल्यांचे राजकारण कळण्याच्या पलिकडचे असते. बांगलादेशी पत्रकार आणि वीकली ब्लिट्झचा संपादक सलाह उद्दीन शोएब चौधरी याने हेदविग एण्टोनिया अल्बानिया माईनो उर्फ सोनिया गांधी यांच्या पूर्वायुष्यावर खळबळजनक लेख लिहीला. त्या आयएसआयच्या डीप स्टेट असल्याचा आरोप केला. त्यामुळे खवळलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चौधरी विरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. तो भारतात नसल्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई कोण करणार आणि कशी करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहेच. सोनिया गांधी या केजीबीच्या एजण्ट आहेत, या आरोपाचे काय? हा आरोप काँग्रेसला मान्य आहे का? हा आरोप डॉ.सुब्रमण्यम स्वामी गेली अनेक वर्षे करीत आहेत. परंतु त्या विरुद्ध काँग्रेसने साधा निषेधही केलेला नाही.

यूपीए सरकारच्या काळात ज्या सुपर प्राईम मिनिस्टर होत्या. कधीकाळी देशाच्या पंतप्रधानांना निरोप पाठवून बोलावून घेण्याची ताकद ज्यांच्याकडे होती, अशा शक्तिशाली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना एक बांगलादेशी पत्रकार आयएसआय़चा एजण्ट म्हणतो, त्यांच्या नागरिकत्वाबाबत, देशनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह लावतो, त्यांच्या भानगडी बाहेर काढतो, तरीही काँग्रेसवाले खवळून उठत का नाहीत, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई का करत नाहीत. असा सवाल न्यूज डंकाने केला होता. उशीरा का होईना काँग्रेसवाले जागे झाले. त्यांनी सोनिया गांधी यांची बदनामी केल्याप्रकरणी सलाह उद्दीन शोएब चौधरी याच्याविरोधात बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल केला. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या कारवाईमुळे प्रश्न संपण्याच्याऐवजी वाढले आहेत.

सलाह उद्दीन शोएब चौधरीचे सोनिया गांधी यांच्या पूर्वायुष्यावर लिहीलेले लेख सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालतायत. चौधरी भारतीय नसल्यामुळे सुरूवातीला त्यांची दखल घेतली नाही, अशी सारवासावर काँग्रेसवाले करू शकतात. परंतु सोनियांवर असे प्रश्नचिन्ह लावणारे चौधरी एकमेव नाहीत. भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी गेली अनेक वर्षे सोनिया गांधी यांच्यावर आरोप लावतायत. सोनियांचे वडील स्टीफेनो हे नाझी सैनिक होते. परंतु युद्धकैदी म्हणून दोन वर्षे रशियन तुरुंगात काढल्यानंतर ते सोव्हीएट धार्जिणे झाले. ते के.जी.बी या रशियन गुप्तचर संस्थेचे हस्तक बनले. असे अनेक गौप्यस्फोट स्वामी यांनी ‘नो यूवर सोनिया’ या प्रदीर्घ लेखात केलेले आहेत. हा लेख आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे.

पुढे ते म्हणतात, इंदिरा गांधी राजीव-सोनिया यांच्या विवाहाला अनुकूल नव्हत्या. सोव्हीएट धार्जिणे असलेले भारतीय मुत्सद्दी त्रिलोकीनाथ उपाख्य टी.एन.कौल यांनी या विवाहामुळे भारत-सोव्हीएट संबंध मजबूत होतील, ही बाब इंदिरा गांधी यांच्या गळी उतरवल्यामुळे इंदिराजींनी या विवाहाला मंजुरी दिली. रशियन नेतृत्वाच्या इच्छेशिवाय कौल यांनी असे केले नसेल. राजीव यांच्या विवाहानंतर रशियन डीप स्टेटचा देशातील सर्वात शक्तिशाली कुटुंबात प्रवेश झाला, लग्नापूर्वी लंडनमध्ये एका पाकिस्तानी उद्योजकाच्या एस्कॉर्ट सर्व्हीसमध्ये काम करत होत्या, असा दावा स्वामी यांनी केलेला आहे. म्हणजेच चौधरी आणि स्वामी यांच्या आरोपातील तपशीलात फार फरक नाही.

स्वामींचे हे दावे नवे नाहीत. अनेक वर्षे ते याबाबत लिहितायत, बोलतायत. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी सोनियांच्या चारित्र्याबाबत धक्कादायक विधाने केलेली आहेत. सोनिया गांधी, त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्याविरोधात ते न्यायालयीन लढाई लढतायत. राहुल गांधी हे भारतीय नसून ब्रिटीश नागरीक आहेत, ती तक्रारही त्यांचीच. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वामींच्या या दाव्याचे खंडन केले नाही. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली नाही, पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नाही, त्याचे कारण काय असावे? काँग्रेसला सलाह उद्दीन शोएब चौधरीचे दावे मान्य नाहीत. सोनियांची बदनामी झाल्याची त्यांची भावना झाली आहे. दुखावल्यामुळे त्यांनी पोलिस कारवाई केलेली आहे. पण मग आजवर अशी कारवाई स्वामींच्या विरोधात का झालेली नाही. स्वामींचे दावे काँग्रेसला मान्य आहेत काय? सोनिया या पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजण्ट असल्याचा सलाह उद्दीन शोएब चौधरींचा दावा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना खोडून काढायचा आहे. परंतु त्या केजीबीच्या हस्तक आहेत, हा स्वामींचा दावा त्यांनी मान्य केला आहे काय?

हे ही वाचा:

रामगिरी महाराजांना ‘सर तन से जुदा’ची धमकी देणाऱ्या मुहम्मद सादला ठोकल्या बेड्या

मुंबईतील तबेल्यांचे पालघरला स्थलांतर नको, आरेत जागा द्या !

आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग

उत्तर कोरियामध्ये पूर परिस्थिती; ३० अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा

चौधरी हा बांगलादेशी पत्रकार आहे, परंतु सध्या तो बांगलादेशात आहे, की आणखी कुठे हे कुणालाच ठाऊक नाही. कारण बांगलादेशात जे नवे सत्ताधीश आले आहेत, त्यांच्याविरोधात चौधरी घणाघाती टीका करतो आहे. बांगलादेशात सुरू असलेला जिहादी कारभार, हिंदूंवर होणारे अत्याचार याबाबत तो सातत्याने बोलतो आहे. त्यामुळे तो बांगलादेशात असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काँग्रेसने दाखल केलेला एफआयआर त्यांना आत्मिक समाधानाच्या पलिकडे काहीही देईल असे दिसत नाही.

चौधरीने त्याच्या एक्स अकाऊंटवर स्वामींचा एक व्हीडियो रिपोस्ट केला आहे. त्या व्हीडियोमध्ये स्वामींनी सोनियांबाबत जो शब्द वापरलाय तो कोणत्याही महिलेबाबत वापरणे हा निव्वळ असभ्यपणा आहे. भारताच्या सीमेपलिकडे कुठे तरी बसलेला चौधरी काँग्रेसवाल्यांना दिसतो, परंतु देशात बसून गांधी परिवाराचे वस्त्रहरण करणारे स्वामी दिसत नाहीत, हे आश्चर्य आहे.
काँग्रेस स्वामींच्या वाटेला जात नाहीत त्याचे काय कारण असावे? स्वामींच्या वाकड्यात गेलो तर ते जे काही बोलतायत, ते सिद्ध करून दाखवतील अशी काँग्रेसला भीती वाटते आहे का? की स्वामींकडे आणखी काही भयंकर दारूगोळा असल्याची काँग्रेसला भीती आहे? सलाहउद्दीन शोएब चौधरीच्या विरोधात गुन्हा दाखल करून आपण काही तरी केले हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. परंतु स्वामींबाबत मौन बाळगून काँग्रेस नेते सोनिया गांधी यांच्या भोवती असलेले गूढतेचे वलय अधिक गडद करीत आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा