30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेषबहराइचमधील लांडग्यांना पकडण्यासाठी 'टेडी बिअर'चे जाळे !

बहराइचमधील लांडग्यांना पकडण्यासाठी ‘टेडी बिअर’चे जाळे !

वनविभागाकडून लांडग्यांच्या शोधासाठी थर्मल ड्रोनचा वापर

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या लांडग्यांना पकडण्यासाठी वनविभागाने एक शक्कल लढविली आहे. मुलांच्या मूत्रात भिजविलेल्या रंगेबिरंगी टेडी बिअर जागोजागी ठेवून किलर लांडग्यांना जाळ्यात ओढण्याचे काम सुरु आहे. या अनोख्या रणनीतीचा उद्देश, मुलांच्या गंधाने लांडग्यांना आकर्षित करणे, संभाव्यतः शिकारींना सापळ्यात ओढणे हा आहे. वनविभागाने हे टेडी बेअर नदीकाठ, विसाव्याची ठिकाणे आणि लांडग्यांच्या गुहे ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

बहराइचचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ) अजित प्रताप सिंग यांनी सांगितले की, हे लांडगे सतत आपली ठिकाणे बदलत आहेत. ते सहसा रात्री शिकार करतात आणि सकाळपर्यंत त्यांच्या गुहेत परततात. ग्रामस्थ आणि मुलांचे रक्षण करण्यासाठी , लांडग्यांना गोंधळात टाकून ठिक-ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सापळ्यात-पिंजऱ्यात अडकवण्यासाठी या टेडी बिअरचा वापर करणे ही आमची रणनीती आहे.

वन अधिकारी पुढे म्हणाले, लांडग्यांच्या ठिकाणांचा मागोवा घेण्यासाठी ‘थर्मल ड्रोन’चा वापर केला जात आहे. फटाके, आवाज आणि इतर पद्धतींचा वापर करून लांडग्यांना सापळ्यांकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. रंगेबिरंगी कपड्यांमधील हे टेडी बेअर लहान मुलांच्या लघवीत भिजवून ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून लांडगा आकर्षित होईल आणि लहान मुलाच्या उपस्थितीचे अनुकरण करून तो जाळ्यात अडकेल.

हे ही वाचा :

पॅरालिम्पिकमध्ये २१ वे पदक; महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारीला गोळा फेकमध्ये रौप्य

मोदींच्या दौऱ्यानंतर आता चेन्नई ते ब्रुनेई…

जळगाव पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याप्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा

मुंबईतील तबेल्यांचे पालघरला स्थलांतर नको, आरेत जागा द्या !

दरम्यान, लांडग्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये ९ लहान मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत चार लांडग्यांना पकडण्यात यश आले असून अजूनही दोन लांडगे मोकाट फिरत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा