29 C
Mumbai
Sunday, June 23, 2024
घरसंपादकीयफडणवीसांनी बुरखा नव्हे; कपडेच फाडले!

फडणवीसांनी बुरखा नव्हे; कपडेच फाडले!

कंत्राटी भर्ती संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केली विरोधकांची पोलखोल

Google News Follow

Related

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात गेल्या सव्वा दीड वर्षात या सरकारवर विरोधकांनी आरोपांची मालिका सुरू केली आहे. अर्थात, विरोधकांकडून आरोप हे केले जातच असतात पण त्यात काही तथ्य नसेल आणि ते आरोप केवळ चिखलफेक आहे, असे दिसत असेल तर मग त्यामागील भूमिका आपोआपच स्पष्ट होते. सध्या विरोधकांच्या आरोपातून केवळ चिखलफेक करणे हा निव्वळ उद्देश दिसतो. कंत्राटी पद्धतीने भर्ती हादेखील विषय असाच विरोधकांनी उकरून काढला. प्रत्यक्षात त्यात काहीही नव्हते पण आपण केलेल्या पापाचे खापर दुसऱ्यावर फोडणे या पलिकडे या आरोपात काहीही नव्हते.

 

पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने तीन हजार पदे भरण्यात येणार असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच आता महाराष्ट्रातील युवक बेरोजगार होणार, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार, आरक्षण संपणार वगैरे हाळी विरोधकांनी द्यायला सुरुवात केली. सुप्रिया सुळे, संजय राऊत, काँग्रेस नेत्यांकडून याच पद्धतीच्या आरोपांची मालिका सुरू करण्यात आली. तेव्हा यातले वास्तव मांडण्याची जबाबदारी मीडियाने मात्र उचलली नाही. त्यामुळे याबद्दल खुलासा करणे क्रमप्राप्त होते.

 

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे या आरोपांची व्यवस्थित पोलखोल केली. त्यांनी पत्रकार परिषदेत कंत्राटी भर्ती हा शब्दप्रयोगच मुळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झाल्याचे सप्रमाण दाखवून दिले. २००३ पासून या कंत्राटी भर्तीचा प्रयोग विविध खात्यात करण्यात आला. मनुष्यबळ कमी असेल तर तिथे तात्पुरती भर्ती करून गरज भागविण्यापलिकडे त्यात काहीही नव्हते. त्यातून नियमित भर्ती किंवा आरक्षणाला कोणताही फटका बसण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण विरोधकांनी या सगळ्याचा इतका बाऊ केला की, त्यामुळे फडणवीसांनी शेवटी याचा खुलासा केला.

 

 

फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण किंवा आता तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि त्यावेळी महाविकास आघाडी सरकारचे कर्तेधर्ते असलेले उद्धव ठाकरे यांच्या काळातही अशी कंत्राटी भर्ती झाली. विविध खात्यात कशी पदे भरण्यात आली याचे सरकारी आदेशच फडणवीसांनी दाखवले. त्यामुळे आता या विरोधकांनी या केलेल्या निरर्थक, बिनबुडाच्या आरोपांबाबत माफी मागायला हवी असे ते म्हणाले. अर्थात, विरोधक माफी मागणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण त्यांचे काम ते चोखपणे बजावत आहेत. चिखल उडवायचा आणि पळायचे हेच त्यांचे गेल्या दीड दोन वर्षातील धोरण राहिलेले आहे. त्यांना आरोपातल्या फोलपणाशी काहीही देणेघेणे नाही.

 

हे ही वाचा:

४३ वर्षांनी बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

चंद्रकात पाटील म्हणाले, माझ्या बॅगेत ८ शर्ट!

आमदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

पहिल्या ‘नमो भारत रॅपिड’ रेल्वेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा!

मुळात पोलिस दलाची भर्ती २०२१ला झाली आहे. ७ हजार पोलिसांना भर्ती करण्यात आले आहे पण त्यांचे प्रशिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तूर्तास मनुष्यबळाची जी आवश्यकता आहे ती भागविण्यासाठी महाराष्ट्रातील राज्य सुरक्षा रक्षक मंडळाकडून माणसांची पूर्ती केली जाणार होती. मात्र विरोधकांनी हा मुद्दा उचलून बडवायला सुरुवात केली. मग त्यांच्या काळात जी अशीच भर्ती विविध खात्यात केली होती, ती कशासाठी केली होती, त्यामुळे आरक्षण संपले का, त्यामुळे युवक हतबल झाले का, ही उत्तरे मात्र त्यांनी दिली नाहीत. फडणवीसांनी आधीच्या सरकारांनी काढलेले जीआर दाखविलेच पण आताचा जीआर रद्द करत असल्याचे सांगितले. त्यामुळे हा कंत्राटी भर्तीचा प्रश्नच आता मिटला आहे.

 

 

फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर लागलीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत हा जीआर रद्द करण्याचीच आमची मागणी होती, अशी सोयीची भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या काळात आपण अशा भर्तीचे जीआर का काढले ते मात्र सांगितले नाही. त्यामुळे गिरे तो भी टांग उपर याचाच प्रत्यय आला.

 

 

बरे फडणवीसांनी पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकताही भासली नसती जर विरोधकांनी जेव्हा आरोप करण्यास सुरुवात केली तेव्हाच अशा प्रकारची कंत्राटी भर्ती आपल्या काळातही केली गेली असा दावा मीडियाने केला असता तर प्रश्न तेव्हाच मिटला असता पण सध्या विरोधकांनी आरोपांची राळ उडवायची आणि ती आपण लोकांपर्यंत पोहोचवायची एवढेच काम केले जात असल्यामुळे विरोधकांचे फावले. आताही फडणवीसांनी याचे स्पष्टीकरण दिले असले तरी त्यातून आपल्याला सोयीची कशी भूमिका घेतली जाईल, हे विरोधक पाहणार आहेत. ते आपली चूक मान्य करतील याची अजिबात शक्यता नाही. दुसऱ्यावर चिखलफेक करताना आपले कपडे, अंग चिखलाने बरबटले तरी चालेल पण दुसऱ्यावर चिखल उडविण्याचा आनंद जर एखाद्याला लुटायचा असेल तर त्याला कोण काय करणार. विरोधकांची तशीच अवस्था आहे. फडणवीसांनी मात्र विरोधकांचा हा बुरखा उतरविला आहे एवढेच नव्हे तर त्यांचे पुरते वस्त्रहरण केले आहे, एवढे मात्र खरे!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा