30 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरसंपादकीयराहुलबाबा तुम्हाला छत्रपतींचे नाव पेलवणार नाही?

राहुलबाबा तुम्हाला छत्रपतींचे नाव पेलवणार नाही?

जो माणूस भारताला देश मानत नाही, त्याला अखंड हिंदुस्तानचे स्वप्न पाहाणारे शिवाजी महाराज काय कळणार.

Google News Follow

Related

श्रद्धाजंली अर्पण करून मोकळे झाले. अहो जयंतीच्या दिवशी अभिवादन करायचे असते, मुजरा केला असता तरी कौतुक झाले असते. मनात श्रद्धाभाव नसताना औपचारिकता पार पाडायला गेले की अशा चुका होतात. महाराष्ट्राचा इतिहास धगधगते यज्ञकुंड आहे, तो राहुल यांना झेपणारा नाही. कारण हा मुस्लिम आक्रमकांचे कंबरडे मोडून काढणारा हा इतिहास आहे. मुघलांचे तख्त फोडणारा इतिहास आहे. हा इतिहास मस्तकावर घेण्यासाठी रक्त, हृदय आणि मन अस्सल भारतीय असावे लागते.

दिल्लीतील सगळ्या रस्त्यांची नावे मुघलांच्या अवघ्या खानदानाला बहाल करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी एखाद्या महत्वाच्या रस्त्याचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे केले नाही. संसदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला तो अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर. मुस्लीम मतपेढी दुखावेल म्हणून छत्रपतींचे नाव घ्यायला काँग्रेस नेत्यांची तयारी नसे. त्यांच्या दृष्टीने अकबर सोयीचा होता. परंतु अलिकडे हिंदुस्तानची हवा अशी बदलली आहे, की पूर्वी फक्त अजमेरच्या दर्ग्यात जाणारे आता मंदिरात जाऊ लागले आहेत, पूर्वी दिल्लीच्या जामा
मशिदीचा इमाम बुखारी याच्याशी गुटर्गू करणारे, अकबराचा जयजयकार करणारे आता छत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणाचे निमंत्रण स्वीकारताना दिसतायत. मनात असो नसो राहुल गांधी यांना छत्रपतींसमोर नतमस्तक व्हायला लागते आहे. मनात नसताना जेव्हा अशा गोष्टी कराव्या लागतात तेव्हा जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करण्यासारख्या चुका होतातच.

महाराष्ट्र सरकारने गडकिल्ल्यांवरून अतिक्रमणांची साफसफाई करणार, अशी घोषणा केली आहे. महाराजांचे गडकिल्ले ही आमच्यासाठी मंदिरे आहेत. या गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. अतिक्रमित किल्ल्यांच्या यादीत विशाळगडावरील हजरत सय्यर मलिक रेहान मीरा साहेब दर्गा आहे. मुळात छटाकभर असलेला हा दर्गा आता हडपलेल्या जागेवर आडवा तिडवा विस्तारला
आहे. महाराष्ट्र सरकार जेव्हा या अतिक्रमणावर हथोडा चालवेल तेव्हा राहुल गांधी यांच्या पक्षाने साथ द्यावी, म्हणजे त्यांचे शिवप्रेम किती खरे किती खोटे हे उघड होईल.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या मोफत धोरणाचा फटका हिमाचल प्रदेशाला

भारताच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर, पण अमेरिका भारताला मतदानासाठी पैसे का देतोय?

प्रत्येकाने एक आठवडा राष्ट्रकार्यासाठी दिल्यास देशाला गतवैभव प्राप्त होईल

शेतकरी नेते सुखविंदर सिंग सुख गिल यांच्यावर गुन्हा

‘शिवाजी महाराज म्हणायचे हा देश सगळ्यांचा आहे, सगळ्यांना आपण सोबत घेऊन चालायचे आहे…’ हे विधान राहुल गांधी यांनी सांगली येथे महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी काढले होते. कुठून मिळाले त्यांना हे संदर्भ? राहुल गांधी हल्ली सनातन धर्माचा ओ की ठो माहीत नसताना ज्या आत्मविश्वासाने महाभारत, रामायण आणि हिंदू धर्माबाबत बोलतात, त्याच आत्मविश्वासाने ते छत्रपतींबाबत बोलले. मुळात हा देश सगळ्यांचा नाही. देशाच्या मुळावर उठलेल्या गद्दारांचा तर नाहीच नाही. बांगलादेशी, रोहिंगे सगळ्यांना भारताच्या उरावर बसवून देशाची धर्मशाळा बनवायची आणि त्यांच्या
मतांवर देशात सत्तेची फळे चाखत राहायची हा काँग्रेसचा एजेंडा असू शकतो. शिवाजी महाराजांचा नाही. म्हणून तर त्यांनी बाहेरून घुसलेल्या इस्लामी आक्रमकांविरुद्ध तलवार उचलली.

शिवाजी महाराजांनी दिलेला विचार हा काँग्रेस पक्षाचा बोगस धर्मनिरपेक्षतावाद नाही. तसे असते तर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती आणि हाती भगवा घेतला नसता. काँग्रेसला शिवाजी महाराजांची ही ओळख परवडणारी
नाही. त्यामुळे त्यांना सेक्युलर करण्यासाठी काँग्रेसचे नेते कायम धडपडत असतात. महाराजांच्या सैन्यात मुस्लिमांची संख्या वाढवत वाढवत, ५७ टक्क्यांपर्यंत नेणारे ब्रिगेडी आणि त्यांच्या पाठीशी असलेले राजकीय नेते हेच करत आले आहेत.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना आज महाराजांच्या जयंती दिनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये महाराजांच्या सैन्यात असलेल्या मुस्लीमांची आठवण झालेली आहे. महाराजांचा धगधगता भगवा इतिहास ओढून ताणून हिरवा करण्याचे हे
प्रयत्न आहेत. महाराजांना सेक्युलरीझमच्या साच्यात बसवण्याचा हा प्रयत्न जुना आहे. परंतु इतिहास फार काळ झाकून ठेवता येत नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ब्रिगेडी चष्म्यातून पाहणाऱ्यांनी तसा इतिहास मांडून पाहीला. परंतु
हिंदी सिनेमाच्या पडद्यावर छावा झळकला आणि हा प्रयत्न उधळला गेला.

राहुल गांधी आणि काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराज झेपणार नाहीत, असे आम्ही म्हणालो. जो माणूस भारताला देश मानायला तयार नाही, त्याला अखंड हिंदुस्तानचे स्वप्न पाहाणारे शिवाजी महाराज काय कळणार. सत्तेचा तुकडा चघळायला मिळावा म्हणून अहमद शहा अब्दालीला भारतावर आक्रमण करायला ये, आम्ही तुझी मदत करतो, असे सांगणारे गद्दार
इतिहासाने पाहिलेले आहेत. राहुल गांधी आज वेगळे काय करतायत. भारतात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेच्या नावाखाली अमेरिका आणि ब्रिटनला देशात हस्तक्षेपासाठी साद घालतायत. भारतात लोकशाही वाचवण्याची भाषा करतात आणि जिथे कणभर लोकशाही नाही, त्या चीनची प्रशंसा करतात. चीन डोकलाममध्ये आक्रमक झालेला असताना रात्रीच्या अंधारात चीनी राजदूताला भेटतात. सतत चीनची भाषा बोलत असतात. त्या राहुल गांधी यांना मातृभूमीसाठी तळहातावर शीर घेणारे महाराज यांना महाराज यांचा इतिहास झेपणारा नाही. महाराज सोडा, मुघलांचे हिरवे तख्त फोडणारे महादजी शिंदे यांचाही इतिहास झेपणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा