31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरसंपादकीयचीनच्या मुद्द्यावर राऊतांनी मालकाची री ओढली

चीनच्या मुद्द्यावर राऊतांनी मालकाची री ओढली

स्वत:च्या खानदानाच्या ऐतिहासिक चुका विसरून राहुल गांधी टीका करतात त्यांच्या सुरात संजय राऊत सूर मिसळतात

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर चीनच्या मुद्दयावर टीका करत असतात. एकच गोष्ट वारंवार बोलत राहिली की लोक विश्वास ठेवतात. लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून आता त्यांचे चेलेचपाटेही राहुल गांधी यांची री ओढतायत. शिउबाठाचे नेते संजय राऊत राहुल गांधी यांना खूष करण्यासाठी नेहमीच नाचत असतात. चीनच्या मुदद्यावर त्यांनी केंद्र सरकारला सवाल विचारायला सुरूवात केलेली आहे.

चीन मुद्दयावर राहुल गांधी जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारतात. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या प्रतापाची चर्चा होते. भाजपा नेत्यांना गडे मुर्दे उखाडण्याची संधी मिळते. भाजपा नेते अमित मालविया यांनी ही संधी साधली आहे. पाकिस्तानकडे भारताची ७८ हजार चौ.कि.मी आणि चीनने ३८००० कि.मी. जमीन लाटली आहे. पाकिस्तानने आणखी ५१८० कि.मी. भारताची भूमी चीनला बहाल केलेली आहे. यूपीएचे सरकार असताना ऑक्टोबर २०२२ मध्ये हा अहवाल राज्यसभेत सादर केला होता. मनमोहन सिंह यांच्या काळात लडाखमध्ये एलओसी नजीकची ६४० चौ.की.मी भूमी २०१३ मध्ये ताब्यात घेतली, असा अहवाल माजी परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्याम सरन यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये हा अहवाल पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांना सादर केला होता.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह एका दहशतवाद्याचा खात्मा

ऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार

स्पेनच्या महिला संघाची कमाल; पहिल्यांदाच जिंकले फुटबॉलचे विश्वविजेतेपद

भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मन मंत्र्यांनी चक्क ‘यूपीआय’द्वारे केली भाजीखरेदी

नेहरुंच्या भोंगळ धोरणामुळे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मिळणारे स्थायी सदस्यत्व नाकारले. नेहरुंनी हे सदस्यत्व चीनला द्या अशी विनंती केली. इंदिरा गांधी यांच्या काळात भारताने कच्छिथेवू बेट श्रीलंकेला बहाल केले. हे बेट परत मिळवा अशी विनंती काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या द्रमुकने केंद्र सरकारला एका पत्राद्वारे केली आहे. मोदी सरकारने भारताची भूमी चीनला बहाल केल्याचा एकही पुरावा नाही. परंतु स्वत:च्या खानदानाच्या ऐतिहासिक चुका विसरून राहुल गांधी यांच्यासारखे नादान नेते केंद्र सरकारवर टीका करत असतात. राहुल गांधी यांनी खरे तर त्यांच्या खानदानी चुकांसाठी देशाची माफी मागितली पाहिजे.

राहुल गांधी आणि त्यांच्या खानदानाचा इतिहास जनतेसमोर आहे. परंतु संजय राऊत यांच्यासारखे पोपट राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळून विठू विठू करत असतात. मोदी सरकारला प्रश्न विचारत असतात. संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांचे भाट बनले आहेत. एकेकाळी काँग्रेसवर तुटून पडणारे हे दोन नेते राजकारणात तग धरण्यासाठी राहुल यांना डोक्यावर घेऊन नाचतायत. वेळ प्रसंगी त्यांच्या देशविरोधी भूमिकेचेही समर्थन करतायत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा